पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अंतराळ तंत्रज्ञानसंबंधी नेदरलॅंडबरोबरच्या सामंजस्य कराराला मान्यता देण्यात आली. उभय देशांमध्ये दि. 11 आणि 22 मे 2017 मध्ये अनुक्रमे बंगलोर आणि हेग येथे करार करण्यात आले होते.
कराराचे फायदे-
या करारानुसार उभय देशांमध्ये अवकाश विज्ञान, तंत्रज्ञान, आणि त्यांचा दूरनियंत्रकासह होणारे कार्य, उपग्रहामार्फत होणारा दूरसंवाद, आणि उपग्रहामार्फत स्थानदर्शन यासंबंधी माहिती, तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान होणार आहे. तसेच अंतराळयान, अंतराळप्रणाली यासाठी उभय देशांमध्ये सहकार्य केले जाणार आहे.
नियम –
अंतराळ विभागाची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) आणि नेदरलॅंड अंतराळ कार्यालय यांच्या संयुक्त कार्यकारी समुहाने हा सामंजस्य करार केला आहे. यामुळे अंतराळ क्षेत्रामध्ये नवनवीन संशोधन कार्य करण्यास मदत होणार आहे. तसेच उपग्रह संचार व्यवस्था, उपग्रहामार्फत स्थानदर्शक प्रणाली, अंतराळ विज्ञान यामधील नवीन क्षेत्रांचा शोध लागण्यास मदत होणार आहे. या नवीन शोधांचा उपयोग मानवाच्या फायद्यासाठी होवू शकणार आहे.
N.Sapre/S.Bedekar/Anagha