Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासंदर्भात भारत आणि इंडोनेशिया यांच्यातल्या सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मान्यता


अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासंदर्भात भारत आणि इंडोनेशिया यांच्यातल्या सामंजस्य करारावरच्या स्वाक्षऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली.

यामुळे अंमली पदार्थांचे नियमन आणि तस्करी रोखण्यासंदर्भात परस्पर सहकार्याला मदत होणार आहे. स्वाक्षरी झाल्यादिवसापासून हा करार अस्तित्वात येईल आणि तो पाच वर्षासाठी लागू राहील.

भारताने 37 देशांबरोबर अशाच प्रकारचे करार, सामंजस्य करार केले आहेत.

M.Chopade/N.Chitale/D. Rane