पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने अंमली पदार्थाच्या मागणीत घट आणि अमली पदार्थ, सायकोट्रोपिक आणि रासायनिक पदार्थांच्या अवैध तस्करी रोखण्याबाबत भारत आणि नेपाळ यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करायला मंजुरी दिली आहे.
या सामंजस्य करारात उभय देशांमधील अमली पदार्थांसंदर्भात सहकार्य अधोरेखित करण्यात आले आहे. तसेच दोन्ही देशांच्या सक्षम अधिकाऱ्यांदरम्यान माहितीचे आदान प्रदान व्हावे यासाठी एक यंत्रणा स्थापन करण्यात येणार आहे.
या सहकार्यामुळे अंमली पदार्थ, सायकोट्रोपिक आणि रासायनिक पदार्थांच्या अवैध तस्करीला आळा बसेल.
N.Sapre/S.Kane/P.Kor