पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने अंमली पदार्थ, मादक द्रव्ये आणि रासायनिक संयुगांची अवैध तस्करी आणि संबंधित गुन्ह्यांमध्ये घट करण्यासाठी आणि अवैध वापर रोखण्यासाठी भारत आणि फ्रान्स दरम्यान कराराला मंजुरी दिली आहे.
अंमली पदार्थ, मादक द्रव्ये आणि रासायनिक संयुगांची अवैध तस्करी आणि संबंधित गुन्ह्यांचे प्रमाण कमी करणे आणि अवैध वापर रोखण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान परस्पर सहकार्याला प्रोत्साहन देणे हा या कराराचा उद्देश आहे. माहिती, अनुभव आणि क्षमता निर्मितीच्या आदान-प्रदानाच्या माध्यमातून हे उद्दिष्ट साध्य केले जाईल. या कराराद्वारे दहशतवाद्यांना मिळणारी आर्थिक रसद बंद करण्याच्या उपाय योजनांसह अंमली पदार्थांची तस्करी रोखणे आणि प्रभावी संस्थागत आदान-प्रदानाची स्थापना केली जाईल.
N.Sapre/S.Kane/D.Rane