Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अठराव्या भारत-रशिया वार्षिक परिषदेच्या अनुषंगाने दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारांची यादी


1) भारत सरकार आणि रशियादम्यान राजशिष्टाचारविषयक करार 5 डिसेंबर 2008 साली करण्यात आला होता, त्याचे पुनरुज्जीवन.

2) भारतात रेल्वेसाठी विशेष कंपनी स्थापन करण्याच्या दृष्टीने रशियाच्या अवजड अभियांत्रिकी कंपनी आणि संयुक्त रोखे कंपनी ‘कॅस्केड टेक्‍नॉलॉजिस’ सोबत करार.

3) भारत रशियादरम्यान भांडवली वस्तू वित्तीय आणि भाडेत्तत्वावरील व्यवहार होण्यासाठी सेरी पायाभूत वित्तीय कंपनी आणि विकास तसेच परदेशी वित्तीय व्यवहार बँकविषयक सामंजस्य करार.

4) रेल ट्रान्स होल्डींग आणि संयुक्त रोखे कंपनी तसेच रशियन एक्स्पोर्ट सेंटर या रशियन कंपन्यांचा जेदाह आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा (JITF) नागरी पायाभूत सुविधा कंपनी आणि जिंदाल रेल्वे पायाभूत सुविधा कंपनी या दोन भारतीय कंपन्यांसोबत करार.

5) भारत आणि रशियादरम्यान गुंतवणूक वाढवण्यासाठी इन्व्हेस्ट इंडिया या राष्ट्रीय गुंतवणूक प्रोत्साहन संस्थेसोबत रशियाच्या भारत व्यापार सहकार्य परिषदेसोबत करार.

6) इन्व्हेस्ट इंडिया या राष्ट्रीय गुंतवणूक प्रोत्साहन संस्थेसोबत रशियाच्या रोझ काँग्रेस फाऊंडेशनचा सहकार्य करार.

7) सन ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड या भारतीय कंपनीसोबत रशियाच्या ‘प्रीबोर’ या संयुक्त रोखे कंपनीचा सामंजस्य करार.

*****

B.Gokhale/R.Aghor/D. Rane