Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अफगाणिस्तानातील दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधानांकडून निषेध


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानात काल झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.

पंतप्रधान म्हणाले, ‘अफगाणिस्तानात काल झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. अफगाणिस्तानच्या बहु-सांस्कृतिक रचनेवरील हा हल्ला आहे. पीडीत कुटुंबांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो अशी मी प्रार्थना व्यक्त करतो. या दु:खद प्रसंगी अफगाणिस्तान सरकारला मदत करण्यासाठी भारत तयार आहे.’

B.Gokhale/S.Kane/P.Kor