पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने अंमली पदार्थांच्या मागणीत घट आणि अवैध व्यापाराला आळा घालण्याच्या क्षेत्रात भारत आणि मोझाम्बिक यांच्यातल्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करायला मंजुरी दिली आहे.
माहिती, अनुभव आणि क्षमता निर्मितीच्या देवाणघेवाणीच्या माध्यमातून अंमली पदार्थांच्या मागणीत घट आणि अवैध व्यापाराला आळा घालण्याच्या कामात उभय देशांमधील द्विपक्षीय सहकार्य वृद्धिंगत करणे हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे.
S.Kane/B.Gokhale