Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांनी साधला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद


नवी दिल्‍ली, 8 ऑगस्‍ट 2026

 

अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.  

या वेळी पंतप्रधान आणि उपराष्ट्रपती व्हान्स यांनी भारत-अमेरिका सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक सहकार्यामधील प्रगतीचा आढावा घेतला. दोन्ही देशांमधील उच्चस्तरीय संबंधांमधील सातत्यपूर्ण गतीची दखल घेत त्यांनी व्यापार, संरक्षण, महत्त्वपूर्ण व उदयोन्मुख तंत्रज्ञान, ऊर्जा सुरक्षा आणि महत्त्वपूर्ण खनिजे या क्षेत्रांतील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

तसेच, उभय नेत्यांनी परस्परांच्या हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर विचारांची देवाणघेवाण केली.

उपराष्ट्रपती व्हान्स आणि त्यांच्या पत्नी उषा व्हान्स यांना पुत्रप्राप्तीबद्दल पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे अभिनंदन केले.

 

* * *

शिल्पा नीलकंठ/वैभवी जोशी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai