Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अभिनंदन


अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

“अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन”

आपल्या प्रचारादरम्यान भारताप्रती दाखवलेली मैत्रीपूर्ण भावना प्रशंसनीय आहे. भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंध एका नव्या उंचीवर नेण्यासाठी आम्ही आपल्याबरोबर कार्य करण्यासाठी उत्सुक आहोत, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

M.Desai/S.Tupe/P.Malandkar