पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने केलेल्या दोन मुलभूत ठरावांना लागू करायला मान्यता देण्यात आली. कामावर ठेवताना आवश्यक असलेला वयोमर्यादेचा किमान वयोमर्यादा ठराव(क्र. 138) व अतिशय वाईट बालकामगार पध्दतींना प्रतिबंध करणारा अतिशय वाईट बालकामगार पद्धती ठराव(क्र. 182) या ठरावांबाबत निर्णय घेण्यात आले. बालकामगार समस्येचे उच्चाटन करण्यासाठी सरकारने विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू केले असून त्यासाठी विविध कायद्यांची आणि कार्यक्रमांचा आधार घेतला जात आहे. भारत हा आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा संस्थापक सदस्य आहे. ही संघटना 1919 मध्ये स्थापन झाली. सध्या या संघटनेचे 187 सदस्य असून विविध ठराव, शिफारशी आणि राजशिष्टाचार यांच्या स्वरुपात आंतरराष्ट्रीय मापदंड प्रस्थापित करण्याचा या संघटनेचा मुख्य उद्देश आहे. भारताने आतापर्यंत 45 ठरावांना मान्य केले असून त्यापैकी 42 ठराव लागू झाले आहेत. त्यापैकी 4 ठराव मुलभूत किंवा प्रमुख ठराव आहेत.
N.Sapre/S.Patil/Anagha