Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कोलकाता येथे चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानी बद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त


नवी दिल्‍ली, 17 ऑक्‍टोबर 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकाता येथे झालेल्या चेंगराचेंगरीतील जीवितहानी बद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

ही घटना अत्यंत दुःखद असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रति शोकसंवेदना व्यक्त केल्या असून, जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी सदिच्छा व्यक्त केली आहे. या घटनेतील बाधित कुटुंबांना पश्चिम बंगाल सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जात असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले आहे.

चेंगराचेंगरीच्या या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. तसेच, जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स या सामाजिक माध्यमावरील एका संदेशात म्हटले आहे की, 

“कोलकात्यात झालेली चेंगराचेंगरी अत्यंत दुःखद आहे. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमी झालेले लवकर बरे व्हावेत, अशी सदिच्छा व्यक्त करतो. पीडितांना स्थानिक प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत केली जात आहे.
@narendramodi”

 

 

 

 

 

* * *

नेहा कुलकर्णी/राज दळेकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai