Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीचा बीमोड आणि गंभीर स्वरूपाचे संघटित गुन्हे रोखण्यासाठी सहकार्य आणि माहितीच्या आदान-प्रदानासंबंधी भारत, ब्रिटन आणि उत्तर आयर्लंड यांच्यातील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्री मंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्री मंडळाने आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीचा बीमोड आणि गंभीर स्वरूपाचे संघटित गुन्हे रोखण्यासाठी सहकार्य आणि माहितीच्या आदान-प्रदानासंबंधी भारत, ब्रिटन आणि उत्तर आयर्लंड यांच्यातील सामंजस्य कराराला मंजुरी दिली आहे.

भारत आणि ब्रिटन दरम्यान गुन्ह्यांचा तपास आणि खटला चालवणे ,गुन्ह्याद्वारे मिळवलेली संपत्ती तसेच गुन्ह्याची साधने ( चलन हस्तांतरणासह) आणि दहशतवादी निधीचा तपास, निधी रोखणे आणि जप्ती याबाबत १९९५ मध्येच करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. आंतरराष्ट्रीय गुन्हे आणि गंभीर संघटित अपराधांविरोधात लढण्यासाठी सहकार्य अधिक दृढ करण्याची दोन्ही देशांची इच्छा आहे. या सामंजस्य करारामुळे सुरक्षा क्षेत्रात सहकार्य मजबूत होईल जे परस्परांसाठी लाभदायक असेल.

N.Sapre/S.Kane/P.Malandkar