Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आंतरराष्ट्रीय चित्ता दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या सर्व वन्यजीवप्रेमींना शुभेच्छा


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंतरराष्ट्रीय चित्ता दिनानिमित्त चित्त्याच्या संवर्धनासाठी कार्यरत सर्व संवर्धन कार्यकर्ते आणि वन्यजीवप्रेमींना शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी म्हणाले, “चित्ता या दिमाखदार प्राण्याच्या व त्याच्यासाठी आवश्यक असलेल्या परिसंस्थेच्या संरक्षणासाठी आमच्या सरकारने तीन वर्षांपूर्वी चित्ता प्रकल्पाची सुरुवात केली होती. आपण गमावलेला पर्यावरणीय वारसा व जैवविविधतेच्या पुनरुज्जीवनासाठी देखील या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत.

पंतप्रधानांनी एक्स वरील आपल्या संदेशात लिहिले आहे,

“आपल्या पृथ्वीवरील सर्वात उल्लेखनीय प्राण्यांपैकी एक असलेल्या चित्त्याच्या संवर्धनासाठी कार्यरत सर्व संवर्धन कार्यकर्ते व वन्यजीवप्रेमींना आजच्या आंतरराष्ट्रीय चित्ता दिनानिमित्त शुभेच्छा. चित्ता या दिमाखदार प्राण्याच्या व त्याच्यासाठी आवश्यक असलेल्या परिसंस्थेच्या संरक्षणासाठी आमच्या सरकारने तीन वर्षांपूर्वी चित्ता प्रकल्पाची सुरुवात केली होती. आपण गमावलेला पर्यावरणीय वारसा व जैवविविधतेच्या पुनरुज्जीवनासाठी देखील या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत.

***

नितीन फुल्लुके/उमा रायकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai