Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

केरळममधल्या त्रिशूर येथल्या फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक


नवी दिल्ली, 21 एप्रिल 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, केरळममधल्या त्रिशूर येथल्या फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल  शोक व्यक्त केला आहे.दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा घडो, अशा  सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

पंतप्रधानांनी पीएमएनआरएफमधून प्रत्येक मृताच्या वारसाला 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये सानुग्रह मदत जाहीर केली आहे.  

पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले आहे : 

“केरळममधल्या त्रिशूर येथल्या फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल  ऐकून अत्यंत दुःख झाले. दुर्घटनेत ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्याप्रति माझ्या संवेदना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो: PM @narendramodi”

“पीएमएनआरएफमधून प्रत्येक मृताच्या वारसाला 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत पंतप्रधानांनी जाहीर केली आहे. जखमींना 50,000 रुपये  मदत दिली जाईल “

सुषमा काणे/सोनाली काकडे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai