Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त लखनौ इथे सामूहीक योग प्रात्यक्षिक कार्यक्रमात पंतप्रधानांची उपस्थिती

आंतरराष्ट्रीय योग दिन 2017 निमित्त आज लखनौ इथे आज आयोजित सामूहीक योग प्रात्यक्षिक कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी झाले होते.
शहरात सतत पाऊस पडत असताना देखील, रमाबाई आंबेडकर मैदानात आयोजित या कार्यक्रमाला हजारो लोकं जमा झाले होते.
उत्साहपूर्ण जमावाला लखनौ इथून संबोधित करताना पंतप्रधानांनी योग दिन समारंभात सहभागी होणाऱ्या संपूर्ण भारतातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

ते म्हणाले, योग आज अनेक लोकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनत आहे. भारताबाहेरही योगाची लोकप्रियता वाढत आहे आणि ‘योग’ने जगाला भारताशी जोडले आहे.

पंतप्रधान म्हणाले की, गेल्या तीन वर्षांपासून अनेक योग संस्था आकार घेत आहेत हे बघून मला खूप आनंद होत आहे आणि योग शिक्षकांची मागणी वाढत आहे, असे नमूद केले. फिटनेस शिवाय निरोगीपणा देखील महत्वाचा आहे. मोदी म्हणाले आरोग्य प्राप्त करण्यासाठी योग हे एक उत्तम माध्यम आहे.

योगाभ्यासाला सर्वांनी आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग करा, अशी विनंती करताना पंतप्रधान म्हणाले, ‘योग’ ही आरोग्याची खात्री आहे आणि हे फार खर्चिक देखील नाही.

याआधी लखनौमध्ये पंतप्रधानांचे स्वागत करताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, योग हा आपल्या परंपरेचा भाग आहे आणि हा आपल्याला एकत्र जोडून ठेवतो.

B.Gokhale/S.Mhatre/D. Rane