Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आंतरराष्ट्रीय सौर युती मुख्यालयाच्या भूमीपूजन समारंभासाठी पंतप्रधान आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी मेट्रोतून गुरगावचा प्रवास केला

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांनी, आंतरराष्ट्रीय सौर युती मुख्यालयाच्या भूमीपूजन समारंभासाठी, आज मेट्रोने नवी दिल्ली ते गुरगाव प्रवास केला.

हवामान बदलाच्या आव्हानाचा कसा सामना करावा, याबद्दल सर्व जग कशाप्रकारे विचार करत आहे, यांचे स्मरण पंतप्रधानांनी भूमीपूजन प्रसंगी केलेल्या भाषणात केलं. पॅरीस मध्यल्या COP 21 परिषदेच्या वेळी हाती घेतलेल्या दोन महत्वपूर्ण उपक्रमांचा त्यांनी उल्लेख केला. यापैकी एक उपक्रम “मिशन इनोव्हेशन” आहे, ज्यामध्ये तंत्रज्ञानाच्या नाविन्यपूर्ण शोधांद्वारे लोकांना स्वच्छ ऊर्जा पुरवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय सौर युती हा दुसरा उपक्रम असून, त्याद्वारे सौरशक्तीला गवसणी घालण्यासाठी, मुबलक सूर्यप्रकाश असणा-या सर्व देशांना एकत्र आणणं हे लक्ष्य आहे.

हवामान बदलाचा आघात सोसणा-या लोकांसाठी आंतरराष्ट्रीय सौर युती एक जीवनदायिनी म्हणून कार्य करेल, असे पंतप्रधानांनी सांगितले. या संदर्भात त्यांनी वाढत्या सागरी स्तराच्या धोक्याचा सामना करणा-या छोटया द्विप राष्ट्रांचे उदाहरण दिले.

“आंतरराष्ट्रीय सौर युती” ही संघटना, संयुक्त राष्ट्रसंघाप्रमाणेच स्वतंत्र/स्वायत्त संस्था असेल यावर पंतप्रधानांनी भर दिला.

J. Patankar/ B. Gokhale/ M. Desai