पीएम्इंडिया
राष्ट्राध्यक्ष ओलांद, मान्यवर आणि उद्योग जगताचे नेते,
भाषणाची सुरुवात करण्यापूर्वी मी पुन्हा एकदा फ्रान्सच्या जनतेप्रती संवेदना व्यक्त करतो. अशा कठीण प्रसंगातही उत्तम प्रकारे जगाचे यजमानपद निभावल्याबद्दल मी फ्रान्सचे अभिनंदन करतो.
सौरउर्जा संपन्न देशाशी जागतिक स्तरावर सहकार्य करण्याची माझी फार जुनी इच्छा होती. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ओलांद यांनी माझ्या या इच्छेत खूप रस दाखवला आणि मला त्वरीत आणि संपूर्ण सहकार्य करण्याचे मान्य केले.
हवामान बदलाविषयी निर्णायक ठरेल अशा जागातिक परिषदेचे आज इथे उद्घाटन होणार आहे. या सौरउर्जा उपक्रमात ओलांद यांनी प्रत्येक टप्प्यावर सहकार्य केले तसेच या उद्घाटन समारंभाचे सह अध्यक्ष होण्यास मान्यता दिली त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो.
निसर्गाविषयीच्या सुविचारांचे पुस्तक प्रकाशित करण्याच्या माझ्या कल्पनेला ओलांद यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. जगातल्या ज्ञान आणि शहाणपणाचे कायम स्मरण करून घेण्यासाठी हे पुस्तक उपयोगी ठरेल. ह्या पुस्तकाची प्रस्तावनाही आम्ही दोघांनी लिहिली आहे.
प्राचीन काळापासून विविध संस्कृतीमध्ये सूर्याला विशेष स्थान देण्यात आले आहे. भारतीय परंपरेनुसार सूर्य हा सर्व प्रकारच्या उर्जेचा स्त्रोत आहे. ऋग्वेदात म्हटल्याप्रमाणे सूर्य देवता ही सर्व चेतन आणि अचेतन गोष्टींचा आत्मा आहे. अनेक भारतीय लोक आजही त्यांच्या दिवसाची सुरुवात सूर्याला नमन करून करतात.
आज जेव्हा आपले सध्याचे उर्जा स्त्रोत आणि औद्योगीकरणाच्या अतिरिक्त रेट्यामुळे पृथ्वीचे अस्तित्वचं धोक्यात आले आहे, अशा वेळी आपल्याला भविष्याचा विचार करता सौरउर्जेकडे वळण्यावाचून पर्याय नाही.
विकसनशील विश्वाची जबाबदारी अब्जावधी जनतेला समृद्धीकडे नेण्याची आहे, मात्र त्याच वेळी शाश्वत विकासाचे ध्येय गाठण्यासाठी आपल्याला जागतिक स्तरावर काही धाडसी निर्णय घ्यायला हवेत.
याचा अर्थ, विकसित देशांनी विकसनशील देशांच्या विकासासाठी आणि पर्यायाने कार्बन उत्सर्जनासाठी थोडी जागा ठेवायला हवी. हाच हवामानाविषयीचा नैसर्गिक न्याय आहे.
यांचा आणखी एक अर्थ असाही आहे की आपल्याला विकासाचा अमार्ग धरायचा आहे, आणि तो ही कार्बनचे कमीतकमी उत्सर्जन करून.
त्यामुळे , अर्थव्यवस्था, परिसंस्था आणि उर्जा यात योग्य ताळमेळ राखूनचं आपल्याला आपले भविष्य सुनिश्चित करावे लागेल.
जगातील मोठ्या जनसमुदायाला आज सूर्यप्रकाशाचा लाभ मिळतो आहे. मात्र त्याच जनसमुदायातील अनेक लोक आजही ऊर्जेपासून वंचित आहेत.
त्यामुळेच सूर्यप्रकाश आणि सौरउर्जेचा संयोग होणे गरजेचे आहे.
आम्हाला लोकांच्या जीवनात आणि घरात सौरउर्जा पोहोचवायची आहे. त्यासाठी ती अधिक स्वस्त , सहज उपलब्ध होणारी आणि सहज जोडणी करता येणारी असायला हवी.
यासाठी आम्हाला संशोधन आणि नवकल्पनांचा संगम घडवावा लागेल.आम्ही आपले ज्ञान आणि माहितीचे आदानप्रदान करू प्रशिक्षण आणि संस्थाबांधणी , यावरही आमचे लक्ष असून सामाईक दर्जा आणि परिमाण गाठण्यासाठी तसेच नियमनाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याचे काम आम्ही लवकरच पूर्ण करू.
सौरऊर्जेच्या क्षेत्रात गुंतवणूक वाढावी तसेच, संयुक्त उपक्रम आणि नवनव्या वित्तीय यंत्रणा निर्माण करण्यास आम्ही प्रोत्साहन देऊ
शाश्वत उर्जानिर्मितीसाठीच्या जागतिक उपक्रमांसोबत आम्ही भागीदारी करू.
आज सौरउर्जेच्या क्षेत्रात एक क्रांती आली आहे. तंत्रज्ञान विकसित होत आहे, किमती कमी झाल्या आहेत आणि त्याच्या वीज जोडणीतही खूप सुधारणा झाली आहे.
यामुळे संपूर्ण जगाला स्वच्छ उर्जा मिळवण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरताना दिसते आहे.
आज भारतात चार गिगावॅट ऊर्जानिर्मितीची क्षमता आहे आणि वर्ष २०२२ पर्यंत त्यात १०० गिगावॅट सौर उर्जेची भर घालण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. पुढच्या वर्षाच्या अखेरीस या उद्दिष्टात आम्ही १२ गिगावॅटची भर घालणार आहोत.
उद्योग क्षेत्राने मला दिलेल्या प्रतिसादाने मी आनंदित झलो आहे. जर आपण सौरउर्जा सर्वांच्या आवाक्यापर्यंत पोचवली तर त्याच्या माध्यमातून आर्थिक विकासाच्या अपरीमित संधी तयार होतील, ज्यातून नव्या अर्थव्यवस्थेचा पाया रचला जाईल.
ही भागीदारी विकसित आणि विकसनशील देशांना एकत्र आणणारी आहे. या देशांतील सरकारे, उद्योग, प्रयोगशाळा आणि संस्थांना एका व्यवसायाने जोडणारी आहे.
भारताच्या सौर उर्जा राष्ट्रीय संस्थेत या संदर्भातील उपक्रम राबवले जावेत अशी आमची इच्छा आहे. तशा उपक्रमांसाठी आणि सचिवालय स्तरावर पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आम्ही जागा उपलब्ध करून देऊ आणि ३० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे अर्थसहाय्यही देऊ.
या सौरऊर्जा कार्यक्रमाला आम्ही पाच वर्षे मदत करु. तसेच ,इच्छित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दीर्घकाळ उपयुक्त ठरेल असा निधी आपण उभा करू.
आजचा दिवस नव्या आशेचा सूर्यकिरण घेऊन आला आहे. केवळ स्वच्छ उर्जेच्या क्षेत्रात नाही तर , आजही अंधारात असलेल्या गावांमध्ये प्रकाशकिरण घेऊन आला आहे. आपली सकाळ आणि संध्याकाळ सूर्यकिरणांनी उजळवण्यासाठी आला आहे.
धन्यवाद !!
R. Aghor/S.Tupe/N.Sapre
Launch of International Solar Alliance fulfils a long cherished dream. President @fhollande's interest & support has been vital. @COP21
— Narendra Modi (@narendramodi) November 30, 2015
My deepest gratitude to all world leaders who joined launch of International Solar Alliance. Mr. Ban Ki-moon made insightful points. #COP21
— Narendra Modi (@narendramodi) November 30, 2015
International Solar Alliance brings together developed & developing nations, govts. & industries, labs & institutions in a common enterprise
— Narendra Modi (@narendramodi) November 30, 2015
My message to the world- let us turn to the Sun to power our future. https://t.co/IEvPZglKGj
— Narendra Modi (@narendramodi) November 30, 2015
My message to the world- let us turn to the Sun to power our future. https://t.co/IEvPZglKGj
— Narendra Modi (@narendramodi) November 30, 2015
Since ancient times different civilizations have given a special place to Sun: PM @narendramodi #COP21 @COP21en @India4Climate
— PMO India (@PMOIndia) November 30, 2015
In the Indian tradition Sun is the source of all forms of energy: PM @narendramodi at #COP21 @India4Climate https://t.co/rxjyNOkteX
— PMO India (@PMOIndia) November 30, 2015
In the Indian tradition Sun is the source of all forms of energy: PM @narendramodi at #COP21 @India4Climate https://t.co/rxjyNOkteX
— PMO India (@PMOIndia) November 30, 2015
Convergence between economy, ecology and energy should define our future: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 30, 2015
India has capacity of 4GW & we have set a target of adding 100 GW of solar power by 2022: PM @narendramodi at @COP21 @COP21en @India4Climate
— PMO India (@PMOIndia) November 30, 2015
This day is the sunrise of new hope – not just for clean energy, but for villages and homes still in darkness: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 30, 2015