Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आंतर राष्ट्रीय श्रम संघटनेच्या शिफारसीनुसार रोजगार आणि शांतता आणि स्थिती स्थापक कार्य या विषयी नवे लेख पत्र संसदे समोर ठेवण्याला मंत्रिमंडळाची मान्यता


आंतर राष्ट्रीय श्रम संघटनेच्या शिफारसीनुसार, रोजगार आणि शांतता आणि स्थिती स्थापक कार्य याविषयी नवे लेख पत्र संसदे समोर ठेवण्याला केंद्रीय मंत्रि मंडळाने मान्यता दिली आहे. आंतर राष्ट्रीय श्रम संघटनेच्या जिनिव्हा इथे जुलै 2015 मध्ये झालेल्या 106 व्या सत्रात या संदर्भातली शिफारस स्वीकारण्यात आली होती त्याला भारताने पाठींबा व्यक्त केला होता.

या संदर्भातले लेख पत्र प्रत्येक सदस्य राष्ट्राने आपापल्या सक्षम प्राधिकरणा समोर ठेवायचे आहे त्यानुसार भारतात हे लेख पत्र संसदे समोर ठेवण्यात येणार आहे.

आपत्ती आणि संघर्षाच्या काळात उद्भवलेल्या पेचप्रसंगाच्या काळात शांतता आणि स्थिती पूर्ववत येण्यासाठी रोजगार निर्मिती आणि कार्य याबाबतच्या उपाय योजना संदर्भात या शिफारसी, सदस्य राष्ट्रांना मार्गदर्शन करतात.

रोजगारा संदर्भात मुलभूत हक्क, काम करण्याचा हक्क यासह मानवी हक्क, आंतर राष्ट्रीय कामगार मानके, यासह कायद्याचा आदर करण्याच्या गरजेवर या शिफारसीत भर देण्यात आला आहे.

पेच प्रसंगाची स्थिती टाळण्यासाठी सामाजिक संरक्षण यासारख्या उपाय योजना विकसित आणि बळकट करण्याच्या गरजेवर या शिफारसीत भर दिला आहे.

शांतता राखण्यासाठी आणि पेच प्रसंग टाळण्यासाठी सदस्य राष्ट्रांनी बहु आयामी दृष्टीकोन बाळगणे आवश्यक आहे. यामध्ये, रोजगार निर्मितीसाठी स्थानिक अर्थव्यवस्था पूर्व पदावर येण्यासाठी प्रोत्साहन, सामाजिक-आर्थिक एकात्मता, सामाजिक संरक्षण आणि सामाजिक समावेशकता, शाश्वत विकास यांचा समवेश असल्याचे या शिफारसीत नमूद करण्यात आले आहे.

B G/NC