पीएम्इंडिया
आचार्य एन. जी. रंगा कृषी विद्यापीठाला हैदराबादमधे राजमुंद्री येथे कृषी महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी केंद्रीय तंबाखू संशोधन संस्थेची 21.93 एकर जमीन हस्तांतरीत करायला मंजूरी द्यायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मंजूरी देण्यात आली. 50 वर्षांच्या अवधीसाठी दीर्घकालीन भाडे करारावर ही जमीन प्रदान केली जाणार आहे. सध्या हे कृषी महाविद्यालय भाडे तत्वावरील एका संकुलात चालवले जात आहे. जमीन हस्तांतरणानंतर महाविद्यालयाला आपला कायमस्वरुपी परिसर विकसित करणे शक्य होणार आहे.
M.Pange / S. Tupe / M. Desai