Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आझाद हिंद सरकार स्थापनेच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांचा सहभाग

आझाद हिंद सरकार स्थापनेच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांचा सहभाग

आझाद हिंद सरकार स्थापनेच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांचा सहभाग

आझाद हिंद सरकार स्थापनेच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांचा सहभाग


नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सरकारच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर आज तिरंगा फडकवला.

आझाद हिंद सरकारचा 75 वा वर्धापन दिन हा अभिमानाचा प्रसंग असून यासाठी पंतप्रधानांनी देशाचे अभिनंदन केले. सुभाषचंद्र बोस यांच्या दृष्टीकोनातील बलशाली अविभाज्य भारताच्या चित्राचे प्रतिनिधीत्व आझाद हिंद सरकारमध्ये दिसून येते. राष्ट्र उभारणीत आझाद हिंद सरकारचा सक्रिय सहभाग होता. या सरकारने स्वत:ची बँक, चलन आणि स्टॅम्प्सही सुरु केल्या होत्या, असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

सुभाषचंद्र बोस द्रष्टे नेते होते. सामर्थ्यशाली ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी भारतीयांना एकत्रित केले, अशा शब्दात पंतप्रधानांनी नेताजींच्या कर्तृत्वाला उजाळा दिला. त्यांच्यातली देशभक्ती युवा स्थापनेपासूनच दिसून येते. त्यांनी त्यांच्या आईला लिहिलेल्या पत्रांमधून ती समजते, असे पंतप्रधान म्हणाले.

नेताजी भारतीयांचे तर प्रेरणास्रोत होतेच पण जगभरात स्वातंत्र्य आणि स्वहक्कांसाठी लढणाऱ्यांचेही ते प्रेरणास्रोत होते असे सांगून दक्षिण आफ्रिकेचे नेते नेल्सन मंडेला कशा प्रकारे नेताजींपासून प्रेरित झाले होते, ते पंतप्रधानांनी सांगितले.

सुभाषचंद्र बोस यांच्या स्वप्नातील नवभारताच्या उभारणीसाठी अजून बरीच वाटचाल करायची असून नेताजींपासून प्रेरणा घेऊन देशाच्या विकासासाठी काम करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी नागरिकांना केले.

अनेक बलिदानांनंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. ते जपणे नागरिकांचे कर्तव्य असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

राणी झांसी रेजिमेंटची स्थापना करुन सशस्त्र सेना दलात महिलांसाठी समान संधीचा पाया नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ठेवल्याचे पंतप्रधान म्हणाले. हा वारसा सरकार खऱ्या अर्थाने पुढे चालवत असून महिलांना सशस्त्र सेनादलात स्थायी नियुक्ती दिली जाऊन समान संधी दिली जाईल, असे पंतप्रधानांनी सांगितले.

B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar