Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आपल्या नावाने मंदिर बांधण्यात आल्याच्या वृत्ताने पंतप्रधान नाराज


आपल्या नावाने मंदिर बांधण्यात आल्याच्या वृत्ताने आपण नाराज झालो आहोत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान म्हणाले, “माझ्या नावाने मंदिर बांधण्यात येत असल्याचे वृत्त मी पाहिले आणि मला धक्काच बसला. हे भारताच्या महान परंपरेविरुध्द आहे. अशा प्रकारे मंदिर बांधणे हे आपली संस्कृती आपल्याला शिकवत नाही. व्यक्तिगतरित्या मी दु:खी झालो आहे. तुमचा वेळ आणि साधनसंपत्ती स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करण्याच्या कार्यात समर्पित करा.”