Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आयुष्मान भारतमुळे आसाममधल्या गरीब शेतकऱ्याचे वाचले प्राण


आसाममधील द्विजेन कलिता या 35 वर्षीय गरीब शेतकऱ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. जेव्हा त्याला कामरुप मेट्रो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले त्यावेळी तो अर्धवट शुद्धीत होता आणि त्याला खूप वेदनाही होत होत्या. पूर्ण तपासणी केल्यानंतर त्याच्या मेंदूच्या आवरणाखाली रक्ताची गाठ झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याला मेंदूवरील शस्त्रक्रियेची गरज होती.

कलिताची आर्थिक स्थिती गरीब असल्यामुळे या उपचारांचा खर्च करणे त्याच्या कुटुंबियांसाठी अशक्य होते.

मात्र, आयुष्मान भारत PM-JAY योजनेअंतर्गत त्याच्यावर मोफत उपचार होऊ शकतात, अशी माहिती मिळाल्यामुळे त्याच्या कुटुंबाला खरीखुरी आशा निर्माण झाली.

ही योजना त्याच्या सारख्या गरीबांकरता वरदानच असल्याचे कलिताला वाटते.

आज तो निरोगी असून पंतप्रधानांना जगातल्या सर्वाधिक मोठ्या (10.74 कोटी लाभार्थी) आरोग्य योजनेच्या यशोगाथा सांगणाऱ्या 31 जणांमध्ये त्याचा समावेश होता.

गेल्या वर्षभरात कलितासारख्या 50 हजारांहून अधिक रुग्णांना त्यांच्या राज्याबाहेरील आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपलब्ध होणाऱ्या आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत 16 हजार 85 हॉस्पिटलचा समावेश असून आतापर्यंत 41 लाख लाभार्थ्यांवर उपचार करण्यात आले असून 10 कोटींहून अधिक ई-कार्ड वितरित करण्यात आली आहेत.

आयुष्मान भारत अंतर्गत देशभरात 20 हजार 700 हून अधिक आरोग्य केंद्र कार्यरत आहेत.

**************

M.Chopade/J.Patankar/P.Kor