Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आरएलव्ही-टीडी या स्वदेशी पहिल्या अंतराळ प्रक्षेपणानिमित्त पंतप्रधानांतर्फे इस्त्रो शास्त्रज्ञांचे अभिनंदन


भारताच्या आरएलव्ही-टीडी या पुन्हा वापरात आणण्याजोग्या स्वदेशी बनावटीच्या पहिल्या अंतराळ प्रक्षेपण यानाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.

भारताच्या स्वदेशी बनावटीच्या आरएलव्ही-टीडी या पहिल्या अंतराळ प्रक्षेपण यानाचे यशस्वी प्रक्षेपण म्हणजे आपल्या शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रमांचे फळ आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.

इस्त्रो आणि आपल्या शास्त्राज्ञांनी गेली अनेक वर्षे ज्या उत्साहाने आणि निष्ठेने काम केले आहे ती स्फूर्तीदायी असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.

N. Chitale/ B.Gokhale / M. Desai