Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावल्याबद्दल भारतीय महिला क्रिकेट संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन


नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन केले, हा विजय भारतीय क्रिकेटचा एक शानदार विजय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी म्हटले आहे की;

हा सामना अतिशय दमदार झाला. यामध्ये आत्मविश्वास, कौशल्य आणि  उत्कृष्ट संघभावनेचे दर्शन झाले. या विजयामुळे भारताला या क्रीडास्पर्धांमध्ये पहिले सुवर्णपदक मिळाले असे पंतप्रधान म्हणाले. संघाच्या या  कामगिरीमुळे देशाला त्यांचा अभिमान वाटत असून त्यांचा खेळ देशभरातील अगणित युवा क्रिकेट खेळाडूंना प्रेरणा देईल असे सांगून पंतप्रधानांनी या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:

“भारतीय क्रिकेटसाठी एक शानदार विजय!

आशियाई क्रीडास्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवल्याबद्दल आपल्या भारतीय महिला क्रिकेट संघाचे मनःपूर्वक अभिनंदन. स्पर्धेतील ही अतिशय दमदार कामगिरी होती, जी आत्मविश्वास, कौशल्य आणि उत्कृष्ट सांघिक कामगिरीने ओतप्रोत होती.

या ऐतिहासिक विजयामुळे भारताला या क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक मिळाले. संघाच्या या कामगिरीमुळे देशाला त्यांचा अभिमान वाटत असून त्यांचा खेळ देशभरातील अगणित युवा क्रिकेट खेळाडूंना प्रेरणा देईल

संपूर्ण टीमला माझ्या शुभेच्छा: PM @narendramodi”

 
सुषमा काणे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai