Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये ट्रॅप मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांकडून नीरू आणि किनान चेनाई यांचे अभिनंदन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये नेमबाजीत ट्रॅप मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरू आणि किनान चेनाई यांचे अभिनंदन केले आहे.

या जोडीने अंतिम फेरीत आशियाई विक्रम नोंदवत या प्रकारात भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिलेवहिले सुवर्णपदक मिळवून दिले, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे :

“आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मधील ट्रॅप मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकून देशाचा गौरव केल्याबद्दल नीरू आणि किनान चेनाई यांचे अभिनंदन.

भारतीय जोडीने अंतिम फेरीत आशियाई विक्रम नोंदवत या प्रकारात भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिलेवहिले सुवर्णपदक मिळवून दिले.

भारतीय नेमबाजीच्या इतिहासातील ही संस्मरणीय कामगिरी आहे. दोन्ही खेळाडूंनी केलेल्या शानदार कामगिरीचे कौतुक! आगामी काळातही त्यांनी अशीच चमकदार कामगिरी करत देशाचा गौरव करावा, ही सदिच्छा.” PM @narendramodi

***

राधिका अघोर/वैभवी जोशी/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]