Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई क्रीडा स्पर्धा  2026 मध्ये तिरंदाजी स्पर्धेतील महिलांच्या कंपाउंड सांघिक प्रकारात  सुवर्णपदक  जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी ज्योती सुरेखा वेन्नम, पृथिका प्रदीप आणि चिकिथा तानिपर्थी यांचे केले अभिनंदन


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये तिरंदाजी स्पर्धेतील महिलांच्या कंपाऊंड सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल ज्योती सुरेखा वेन्नम, पृथिका प्रदीप आणि चिकिता तानिपार्थी यांचे अभिनंदन केले आहे.

या तिघींची  कामगिरी जागतिक विक्रमाच्या बरोबरीचीही ठरली, ज्यामुळे ही कामगिरी अधिकच विशेष बनली आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

हा पराक्रम म्हणजे तिरंदाजांसाठी एक विलक्षण कामगिरी असल्याचे पंतप्रधानांनी म्हंटले असून, त्यांनी संपूर्ण संघाला त्यांच्या भविष्यातील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.

‘एक्स’ या समाज माध्यमांवरील संदेशांत पंतप्रधान म्हणतात :

“भारतासाठी सुवर्ण पदक !

“आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये महिलांच्या कंपाऊंड सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल ज्योती सुरेखा वेन्नम, पृथिका प्रदीप आणि चिकिता तानिपार्थी यांचे अभिनंदन. या तिघीनी जागतिक विक्रमाशी बरोबरीही केल्याने, हे पदक विशेष ठरले आहे. भारताच्या तिरंदाजांसाठी ही एक अत्यंत उल्लेखनीय कामगिरी आहे. संपूर्ण संघाला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी  शुभेच्छा.  PM@narendramodi”

***

राधिका अघोर/सविता म्हसकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]