Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई क्रीडा स्पर्धेत, तिरंदाजीमध्ये वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्ण पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल  कुमकुम अनिल मोहोडचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


नवी दिल्ली, 3  ऑक्टोबर 2026

2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी स्पर्धेतील  वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुमकुम अनिल मोहोडचे अभिनंदन केले आहे.

निर्णायक ‘शूट-ऑफ’मध्ये तिने राखलेला संयम विशेष उल्लेखनीय होता, असे पंतप्रधान म्हणाले.

कुमकुम अनिल मोहोडला सातत्यपूर्ण यशासाठी आणि पुढील वाटचालीसाठी पंतप्रधान मोदींनी तिला शुभेच्छा दिल्या.

‘एक्स’ या समाजमाध्यमांवरील संदेशांत पंतप्रधान म्हणाले :

“एक असे सुवर्णपदक जे नेहमीच स्मरणात राहील.

2026  च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ‘वैयक्तिक रिकर्व्ह ‘ प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरल्याबद्दल कुमकुम अनिल मोहोड हिचे अभिनंदन. निर्णायक ‘शूट-ऑफ’मधील तिने दाखवलेला संयम विशेष उल्लेखनीय होता. तिला उत्तरोत्तर असेच यश मिळत राहो ! तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा: पंतप्रधान @narendramodi

***

सुषमा काणे/सविता म्हसकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai