Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या ‘स्कीट टीम’ प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनंतजीत सिंग नरुका, भवतेघ सिंग गिल आणि मैराज अहमद खान यांचे अभिनंदन केले


नवी दिल्‍ली, 24 सप्‍टेंबर 2026

 

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या ‘स्कीट टीम’ प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल अनंतजीत सिंग नरुका, भवतेघ सिंग गिल आणि मैराज अहमद खान यांचे अभिनंदन केले, या सर्वांची कामगिरी अभिमानास्पद असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

या खेळाडूंची एकाग्रता आणि सांघिक कामगिरी उत्कृष्ट असल्याचे सांगत पंतप्रधानांनी त्यांना त्यांच्या आगामी कारकिर्दीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये म्हटले आहे: 

आशियाई क्रीडा स्पर्धेतील अभिमानास्पद कामगिरी !

पुरुष गटातील ‘स्कीट टीम’ प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल अनंतजीत सिंग नारुका, भवतेघ सिंग गिल आणि मैराज अहमद खान यांचे अभिनंदन. त्यांची एकाग्रता आणि सांघिक कामगिरी वाखाणण्याजोगी राहिली आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. PM @narendramodi”

 

* * *

नेहा कुलकर्णी/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai