Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

महिलांच्या ‘सांडा’ 60 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकल्याबद्दल नाओरेम रोशिबिना देवीचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन


नवी दिल्‍ली, 24 सप्‍टेंबर 2026

 

महिलांच्या ‘सांडा’ 60 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकल्याबद्दल नाओरेम रोशिबिना देवीचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

सलग तीन आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पदके जिंकणे उल्लेखनीय कामगिरी असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. तिचे सातत्य, धैर्य आणि निर्धार निश्चितच स्तुत्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी तिला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने एक्सवरील पोस्टमध्ये सामायिक केले आहे :

“महिलांच्या सांडा 60 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकल्याबद्दल नाओरेम रोशिबिना देवीचे अभिनंदन.  सलग 3 आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पदके जिंकणे, ही उल्लेखनीय कामगिरी आहे….तिचे सातत्य, धैर्य आणि निर्धार निश्चितच स्तुत्य आहे. भविष्यातील सर्व प्रयत्नांसाठी शुभेच्छा : PM @narendramodi”

 

* * *

नेहा कुलकर्णी/सोनाली काकडे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai