पीएम्इंडिया
नवी दिल्ली,22 सप्टेंबर 2026
आशियाई क्रीडा स्पर्धेत ‘मिक्स्ड मार्शल आर्ट्स’ या क्रीडा प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुचिका तरियालचे अभिनंदन केले आहे. भारतासाठी ही एक ऐतिहासिक कामगिरी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेतील या क्रीडा प्रकारात तिने भारताला पहिले पदक मिळवून दिल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.तिची ही कामगिरी अत्यंत महत्वाची आहे.तिचे समर्पण आणि जिद्दीची प्रशंसा करून, पंतप्रधान मोदी यांनी तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
X वरील एका पोस्टमध्ये, पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे:
“भारतासाठी एक ऐतिहासिक कामगिरी!
‘मिक्स्ड मार्शल आर्ट्स’ मध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल आणि या क्रीडा प्रकारात भारतासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले पदक मिळवून दिल्याबद्दल सुचिका तरियालचे अभिनंदन. तिची ही कामगिरी महत्वाची असून, तिचे समर्पण आणि जिद्द अधोरेखित करते.
पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा : PM @narendramodi”
A historic achievement for India!
Congratulations to Suchika Tariyal on winning a Bronze in Mixed Martial Arts and securing India’s first-ever Asian Games medal in this field. Her achievement is especially significant, highlighting her dedication and zeal.
Best wishes for many more successes ahead: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 22, 2026
सुषमा काणे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
A historic achievement for India!
— PMO India (@PMOIndia) September 22, 2026
Congratulations to Suchika Tariyal on winning a Bronze in Mixed Martial Arts and securing India’s first-ever Asian Games medal in this field. Her achievement is especially significant, highlighting her dedication and zeal.
Best wishes for many…