पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 26 सप्टेंबर 2026
भारताची धावपटू प्राची चौधरी हिने आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 400 मीटर क्रीडा प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तिचे अभिनंदन केले आहे. प्राचीच्या या यशस्वी धावेने भारताला पदक विजेत्यांच्या व्यासपीठावर संस्मरणीय स्थान मिळवून दिल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले आहे. प्राची हिला या पुढच्या वाटचालीत उत्तम यश लाभो अशी सदिच्छाही पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने X या समाजमाध्यमावर सामायिक केलेला संदेश :
“आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 400 मीटर शर्यतीत कांस्यपदक जिंकल्याबद्दल प्राची चौधरी हिचे अभिनंदन. तिच्या यशस्वी धावेने, भारताला पदक विजेत्यांच्या व्यासपीठावर संस्मरणीय स्थान मिळवून दिले. तिच्या आगामी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा : PM @narendramodi”
Congratulations to Prachi Choudhary on winning the Bronze medal in the Women’s 400m at the Asian Games. Her excellent run has earned India a memorable place on the podium. Wishing her the very best for the endeavours ahead: PM @narendramodi pic.twitter.com/jskrrNegHy
— PMO India (@PMOIndia) September 26, 2026
* * *
राधिका अघोर/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai