Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक जिंकल्याबद्दल प्राची चौधरीचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन


नवी दिल्‍ली, 26 सप्‍टेंबर 2026

 

भारताची धावपटू प्राची चौधरी हिने आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 400 मीटर क्रीडा प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तिचे अभिनंदन केले आहे. प्राचीच्या या यशस्वी धावेने भारताला पदक विजेत्यांच्या व्यासपीठावर संस्मरणीय स्थान मिळवून दिल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले आहे. प्राची हिला या पुढच्या वाटचालीत उत्तम यश लाभो अशी सदिच्छाही पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.

यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने X या समाजमाध्यमावर सामायिक केलेला संदेश :

“आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 400 मीटर शर्यतीत कांस्यपदक जिंकल्याबद्दल प्राची चौधरी हिचे अभिनंदन. तिच्या यशस्वी धावेने, भारताला पदक विजेत्यांच्या व्यासपीठावर संस्मरणीय स्थान मिळवून दिले. तिच्या आगामी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा : PM @narendramodi”

 

* * *

राधिका अघोर/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai