Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी नेमबाज सोनम उत्तम मस्कर, एलावेनिल वलारिवन आणि विदर्शा के विनोद यांचे केले अभिनंदन


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मधील महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल सोनम उत्तम मस्कर, एलावेनिल वलारिवन आणि विदर्शा के विनोद यांचे अभिनंदन केले आहे.  मोदी म्हणाले की, त्यांचे यश भविष्यात अनेक खेळाडूंना प्रेरणा देईल.

मोदींनी एक्स या समाजमाध्यमावर लिहिले आहे की,

कठोर परिश्रम आणि सांघिक प्रयत्नांमुळे उत्कृष्ट निकाल हाती आला.

आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मधील महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल सोनम उत्तम मस्कर, एलावेनिल वलारिवन आणि विदर्शा के विनोद यांचा अभिमान वाटतो.

त्यांचे यश भविष्यात अनेक खेळाडूंना प्रेरणा देईल- पंतप्रधान @narendramodi

***

आशिष सांगळे/राजेश शिरभाते/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]