पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 26 सप्टेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई खेळांमध्ये पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये ऐतिहासिक रौप्य पदक जिंकल्याबद्दल सावन बरवाल यांचे अभिनंदन केले आहे.
नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करणारी आणि चार दशकांहून अधिक काळात या स्पर्धेत भारताला मिळालेले पहिले पदक असणारी ही कामगिरी अधिक विशेष आहे, कारण भारताबाहेर जिंकलेले हे देशाचे आशियाई खेळांतील पहिलेच मॅरेथॉन पदक आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. त्यांची सहनशीलता आणि दृढनिश्चय यांचा संपूर्ण देशाला अभिमान आहे, असे नमूद करत मोदी यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
‘एक्स’ वर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान कार्यालयाने नमूद केले:
“आशियाई खेळांमध्ये पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये ऐतिहासिक रौप्य पदक जिंकल्याबद्दल सावन बरवाल यांचे अभिनंदन. नवीन राष्ट्रीय विक्रम आणि चार दशकांहून अधिक काळात या स्पर्धेत भारताचे पहिले पदक; भारताबाहेर जिंकलेले हे देशाचे आशियाई खेळांमधील पहिलेच मॅरेथॉन पदक असल्यामुळे हे यश अधिक विशेष आहे. त्यांची सहनशीलता आणि दृढनिश्चयाचा देशाला अभिमान आहे. पुढील प्रवासासाठी अनेक शुभेच्छा:PM @narendramodi”
Congratulations to Sawan Barwal on a historic Silver in the Men’s Marathon at the Asian Games. A new National Record and India’s first medal in this event in over four decades, this achievement is even more special as the country’s first-ever Asian Games marathon medal won…
— PMO India (@PMOIndia) September 26, 2026
* * *
यश राणे/निखिलेश चित्रे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]