Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल तेजलबेन डामोरचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन.


आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या 200 मीटर  T12 क्रीडाप्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल तेजलबेन डामोरचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.    

तेजलबेन डामोरने आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेच्या प्रवासात अत्यंत दमदार पाऊल टाकत दिमाखात पदार्पण केले आहे असे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले असून तेजलबेन डामोरने आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठ्या मंचावर इतकी आश्वासक कामगिरी करुन आपली प्रतिभा आणि उज्ज्वल भविष्याचे दर्शन घडवले आहे असे सांगून पुढील कारकिर्दीसाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:  

“तेजलबेन डामोर यांचे  उत्कृष्ट पदार्पण!

तेजलबेन डामोरने आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेच्या प्रवासात यशस्वी पदार्पण करत महिलांच्या 200 मीटर  T12 क्रीडाप्रकारात कांस्यपदक जिंकले. 

आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित मंचावर इतकी आश्वासक कामगिरी करणे हे तिच्या प्रतिभेची आणि उज्ज्वल भविष्याची साक्ष देते. तिच्या आगामी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

PM @narendramodi”

***

 

NehaKulkarni / BhaktiSontakke / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai