आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या एफ55 थाळीफेक प्रकारात वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवत कांस्यपदक जिंकल्याबद्दल करमज्योती हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.
चिकाटी, कठोर परिश्रम आणि स्वतःवरील विश्वास यांच्या जोरावर उल्लेखनीय प्रगती साधता येते, याचे करमज्योती हिचा क्रीडा प्रवास हे उत्तम उदाहरण असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
पंतप्रधान कार्यालयाने ‘X’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे,
“आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या एफ55 थाळीफेक प्रकारात करमज्योती हिने सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी नोंदवत कांस्यपदक जिंकले आहे. तिचे अभिनंदन. चिकाटी, कठोर परिश्रम आणि स्वतःवरील विश्वास यांच्या जोरावर उल्लेखनीय प्रगती साधता येते, याचे तिचा क्रीडा प्रवास हे उत्तम उदाहरण आहे. : पंतप्रधान @narendramodi”
Karamjyoti has won Bronze in the Women’s Discus Throw F55 event at the Asian Para Games 2026 with a personal best. Congratulations to her. Her sporting journey is a wonderful example of how perseverance, hard work and self-belief can lead to remarkable progress: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 21, 2026
***
Nilima Chitale / Madhuri Pange / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai