Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल मनजीत याचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या एफ12/एफ13 भालाफेक प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल मनजीत याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.

गेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत चौथे स्थान मिळवल्यानंतर 2026 मध्ये रौप्यपदक जिंकण्यापर्यंतची मनजीत याची प्रगती उल्लेखनीय असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. त्याचे यश कठोर परिश्रम, महत्त्वाकांक्षा आणि समर्पण यांची साक्ष देते, असे त्यांनी सांगितले. आगामी काळातही मनजीत भारताची मान उंचावत राहील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान कार्यालयाने ‘X’ या समाज माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे,

“मनजीत याच्या प्रगतीचा प्रवास किती उल्लेखनीय आहे! मागील आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत चौथे स्थान मिळवल्यानंतर 2026 मध्ये त्याने पुरुषांच्या एफ12/एफ 13 भालाफेक प्रकारात रौप्यपदक जिंकत मोठी प्रगती केली आहे. त्याचे अभिनंदन. त्याचे यश कठोर परिश्रम, महत्त्वाकांक्षा आणि समर्पण यांची साक्ष देते. आगामी काळातही तो भारताची मान उंचावत राहो, ही सदिच्छा. : पंतप्रधान @narendramodi”

***

Nilima Chitale / Madhuri Pange / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai