Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धांमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल भाग्यश्री जाधव यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धांमध्ये  महिलांच्या गोळाफेक  F34 प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत, तसेच वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाग्यश्री जाधव यांचे अभिनंदन केले. भाग्यश्री जाधव यांनी  पुन्हा एकदा भारताचा गौरव वाढवला आहे, अशा शब्दांत त्यांनी प्रशंसा केली आहे.

 

मागील स्पर्धेच्या तुलनेत भाग्यश्री यांनी आपल्या कामगिरीत सुधारणा करत , उल्लेखनीय सातत्य आणि अधिक चांगली कामगिरी करण्याचा निर्धार प्रदर्शित केल्याचे नमूद करून, पंतप्रधानांनी या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्यांची चिकाटी खरोखरच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

पंतप्रधान कार्यालयाने X वरील पोस्टमध्ये लिहिले आहे:

“आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धांमध्ये  आणखी एक रौप्य पदक आणि नवीन वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी!

भाग्यश्री जाधव हिने महिलांच्या गोळा फेक  F34 प्रकारात उत्कृष्ट फेक करत रौप्य पदक पटकावले आणि पुन्हा एकदा भारताचा गौरव वाढवला. मागील स्पर्धेच्या तुलनेत तिने आपल्या कामगिरीत सुधारणा करत, उल्लेखनीय सातत्य आणि अधिक चांगला खेळ प्रदर्शित करण्याचा निर्धार दर्शवला. या यशाबद्दल भाग्यश्रीचे अभिनंदन. तिची चिकाटी खरोखरच प्रेरणादायी आहे: पंतप्रधान  @narendramodi”

***

Nilima Chitale / Rajashree Agashe / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai