आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 100 मीटर टी35 प्रकारात उत्कृष्ट कालावधी नोंदवत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अनुभव चौधरी याचे अभिनंदन केले.
ही संस्मरणीय पदार्पणाची कामगिरी असून, त्याचा वैयक्तिक सर्वोत्तम कालावधीही आहे. त्यामुळे त्यांच्या क्रीडा प्रवासाची सुरुवात प्रभावी झाली आहे, असे नमूद करून पंतप्रधानांनी या उल्लेखनीय यशाबद्दल त्याचे अभिनंदन केले. त्याच्या क्रीडा कारकिर्दीत यापुढेही अशाच अनेक यशस्वी टप्प्यांची भर पडेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे,
“संस्मरणीय पदार्पण आणि वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी!
अनुभव चौधरी याने आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेतील आपल्या प्रवासाची प्रभावी सुरुवात केली आहे. पुरुषांच्या 100 मीटर टी35 प्रकारात उत्कृष्ट कालावधी नोंदवत त्याने कांस्यपदक जिंकले. या उल्लेखनीय यशाबद्दल त्याचे अभिनंदन. त्याच्या क्रीडा कारकिर्दीत यापुढेही अशाच अनेक यशस्वी टप्प्यांची भर पडो, ही सदिच्छा. : पंतप्रधान @narendramodi”
A memorable debut and a personal best!
Anubhav Choudhary has made an impressive start to his Asian Para Games journey, winning Bronze in the Men’s 100m T35 event with an impressive timing. Congratulations to him on this wonderful achievement. May this lead to many more milestones in his sporting career: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 21, 2026
***
Nilima Chitale / Nikhilesh Chitre / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
A memorable debut and a personal best! Anubhav Choudhary has made an impressive start to his Asian Para Games journey, winning Bronze in the Men's 100m T35 event with an impressive timing. Congratulations to him on this wonderful achievement. May this lead to many more milestones in his sporting career: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 21, 2026