Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल मोहम्मद बासिल एम. याचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या 100 मीटर T47 प्रकारात प्रभावी वेळ नोंदवत  रौप्यपदक पटकावल्याबद्दल मोहम्मद बासिल एम याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पात्रता फेरीत विक्रम मोडणे आणि अंतिम फेरीत स्वत:चा विक्रम सुधारणे, हे प्रतिभा आणि दृढनिश्चयाचे उत्कृष्ट प्रदर्शन आहे असे मोदी यांनी नमूद केले आणि या चमकदार कामगिरीबद्दल बासिल यांची प्रशंसा केली.

पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये लिहिले आहे:

“मोहम्मद बासिल एम. याने आशियाई पॅरा गेम्स 2026 मध्ये पुरुषांच्या 100 मीटर T47 प्रकारात प्रभावी वेळ नोंदवत रौप्य पदक पटकावले आहे. पात्रता फेरीत विक्रम मोडल्यानंतर, त्याने अंतिम फेरीत स्वतःचीच सर्वोत्तम कामगिरी अधिक सुधारली. प्रतिभा आणि दृढनिश्चयाचे हे उत्कृष्ट प्रदर्शन आहे. या संस्मरणीय कामगिरीबद्दल बासिलचे अभिनंदन: पीएम @narendramodi”

***

Nilima Chitale / Madhuri Pange / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai