पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर 2026
आशियायी क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 4×400m रिले शर्यतीत उत्कृष्ट वेळ नोंदवत कांस्य पदकाची कमाई करणाऱ्या धरमवीर चौधरी, मनू टीएस, जय कुमार आणि विशाल टीके या चौघांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
हा संघाचा एक दमदार सामूहिक प्रयत्न होता आणि पोडियमवर त्यांना मिळालेले हे स्थान अत्यंत योग्य आहे, असे मोदी म्हणाले. त्यांनी खेळाडूंना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. भारताची मान ते अशीच अभिमानाने उंचावत राहतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
त्यांचे यश इतर खेळाडूंना प्रेरणा देण्यासाठी खूप मोलाचे ठरेल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान कार्यालयाने ‘X’ वरील पोस्टमध्ये म्हटले आहे:
“पुरुषांच्या 4×400m रिले शर्यतीत उत्कृष्ट वेळेसह कांस्य पदक जिंकल्याबद्दल धरमवीर चौधरी, मनू टीएस, जय कुमार आणि विशाल टीके यांचे अभिनंदन. हा एक दमदार सांघिक प्रयत्न होता आणि पोडियमवरील त्यांना मिळालेले स्थान अतिशय योग्य आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. ते भारताची मान अशीच उंचावत राहोत. हे यश इतर खेळाडूंना प्रेरणा देण्यासाठी खूप मोलाचे ठरेल.”
Congratulations to Dharmveer Chaudhary, Manu TS, Jay Kumar and Vishal TK on winning Bronze in the Men’s 4×400m Relay with a superb timing. It was a spirited team effort and a fitting podium place. My best wishes for their upcoming endeavours. May they keep making India proud.…
— PMO India (@PMOIndia) October 1, 2026
* * *
शैलेश पाटील/प्रज्ञा जांभेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai