नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर 2026
आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या 1500 मीटर T11 स्पर्धेत देशाला कांस्य पदक जिंकून दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रावण्णी वलसानैनीचे अभिनंदन केले आहे.
रावण्णी वलसानैनीने आपली सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी नोंदवत, हक्काने पदक विजेत्यांच्या व्यासपीठावर स्थान मिळवल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. या कामगिरीतून रावण्णी वलसानैनीने देशाच्या पॅरा खेळाडूंची जिद्द आणि चिकाटीची प्रचिती येते असे म्हणत, त्यांनी तिचे अभिनंदन केले आहे.
या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाने X या समाजमाध्यमावर सामायिक केलेला संदेश,
“सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आणि हक्काने पदक विजेत्यांच्या व्यासपीठावर मिळवलेले स्थान!
रावण्णी वलसानैनीने आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या 1500 मीटर T11 स्पर्धेत देशाला कांस्य पदक जिंकून दिले. तिच्या या कामगिरीतून देशाच्या पॅरा खेळाडूंची जिद्द आणि चिकाटीची प्रचिती येते. तिचे अभिनंदन : PM @narendramodi”
A personal best and a well-earned podium finish!
Ravanni Valasanaini has brought home Bronze in the Women’s 1500m T11 event at the Asian Para Games 2026. Her performance reflects the determination and perseverance that define our para-athletes. Congratulations to her: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 20, 2026
* * *
शैलेश पाटील/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
A personal best and a well-earned podium finish! Ravanni Valasanaini has brought home Bronze in the Women's 1500m T11 event at the Asian Para Games 2026. Her performance reflects the determination and perseverance that define our para-athletes. Congratulations to her: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 20, 2026