Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सिमरनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन.


आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या 200 मीटर  T12 क्रीडाप्रकारात सुवर्ण पदक जिंकून तसेच नवीन विक्रम प्रस्थापित करुन अद्वितीय कामगिरी करणाऱ्या सिमरनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. 

याआधीच्या स्पर्धेत तिने पटकवलेल्या रौप्य पदकापासून ते आता मिळवलेल्या सुवर्ण पदकापर्यंतचा  विक्रम मोडीत काढणारी तिची  शानदार कामगिरी म्हणजे उत्कृष्टतेच्या ध्यासाचे प्रतीक आहे असे सांगून पंतप्रधानांनी सिमरनला नवीन अडथळ्यांवर मात करत आणखी उंच यशोशिखरे सर करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:

सुवर्णपदक आणि एक नवा विक्रम !

सिमरनने आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या 200 मीटर T12 क्रीडाप्रकारात सुवर्ण पदक जिंकून शानदार कामगिरी केली आहे. सुवर्णपदक जिंकल्याबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन.

यापूर्वीच्या स्पर्धेतील रौप्य पदकापासून ते आताच्या  विक्रमी कामगिरीसह सुवर्णपदकाला गवसणी घालण्यापर्यंतचा तिचा प्रवास उत्कृष्टतेच्या भावनेचे मूर्तिमंत उदाहरण आहे. ती अशीच अडथळे पार करत राहो आणि यशाचे नवीन मापदंड प्रस्थापित करत राहो: पंतप्रधान @narendramodi”

***

NehaKulkarni / BhaktiSontakke / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai