नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मनीष नरवाल याचे अभिनंदन केले. मनीष याने आशियायी पॅरा गेम्समधील पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल एसएच1 प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदक पटकावले आहे.
मनीषने आपल्या एकाग्रतेच्या आणि समर्पणाच्या जोरावर सातत्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, असे नमूद करत पंतप्रधान मोदींनी त्याचे अभिनंदन केले आणि त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये म्हटले आहे की,
“मनीष नरवालने आशियायी पॅरा गेम्समध्ये पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल एसएच1 6 प्रकारात शानदार कामगिरी करत रौप्य पदक जिंकले आहे. मनीषने आपल्या एकाग्रतेच्या आणि समर्पणाच्या बळावर सातत्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा : PM @narendramodi”
Manish Narwal has delivered an impressive performance to win Silver in the Men’s 10m Air Pistol SH1 event at the Asian Para Games 2026 with an impressive score. Manish continues to distinguish himself through his focus and commitment. Congratulations and best wishes for the endeavours ahead: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 20, 2026
* * *
शैलेश पाटील/राजेश शिरभाते/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai