Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशिया-पॅसिफिक व्यापार कराराच्या चौथ्या फेरीतील वाटाघाटी अंतर्गत दर सवलत देवाण-घेवाणीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी


आशिया-पॅसिफिक व्यापार कराराच्या चौथ्या फेरीतील वाटाघाटी अंतर्गंत दर सवलत देवाण-घेवाणीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली.

आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील विकसनशील राष्ट्रांच्या सदस्यांमध्ये दर सवलतीची देवाण-घेवाण करण्यासंदर्भात संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक आयोगाचा हा उपक्रम आहे. एपीटीए अर्थात आशिया-पॅसिफिक व्यापार करारात सध्या भारतासह बांगलादेश, चीन, लाओ पीडीआर, कोरिया आणि श्रीलंका या सहा देशांचा समावेश आहे.

आतापर्यंत या व्यापारविषयक वाटाघाटींच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. एपीटीएच्या मंत्रिपरिषदेच्या लवकरच होणाऱ्या चौथ्या सत्रात या सर्व निर्णयांची अधिकृतपणे अंमलबजावणी होईल.

B.Gokhale/M.Pange/Anagha