Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आसाममधल्या राज्यमंत्रिमंडळ शपथविधी समारंभादरम्यान पंतप्रधानांचे मनोगत

आसाममधल्या  राज्यमंत्रिमंडळ शपथविधी समारंभादरम्यान पंतप्रधानांचे मनोगत


या महत्त्वाच्या घडीला उपस्थित असलेल्या आसामच्या माझ्या बंधू-भगिनींनो,

सर्वप्रथम मी आसामवासियांना नमन करु इच्छितो, ज्यांनी विकासाचे स्वप्न पाहिले आणि हा विकास साधण्यासाठी सर्वानंद आणि त्यांच्या सहकाऱ्यांना, सेवा करण्याची संधी दिली.

सर्वानंद यांना मी ओळखतो. देशभरातल्या आदिवासी समाज सर्वानंद यांचा अभिमान बाळगू शकतो. आदिवासी समाजात जन्मलेल्या आणि समाजाच्या सेवेसाठी समर्पित झुंझार अशा नेत्याने आता आसामचे नेतृत्व हाती घेतले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी या नात्याने त्यांच्या व्यक्तीमत्वाचे अनेक गुण मी पाहिले आहेत. मधुरता हा जणू त्यांच्या व्यक्तीमत्वाचाच एक भाग आहे. मृदुता आणि प्रसन्नचित्त असणारे सर्वानंद, आसामच्या सर्वानंदासाठी कोणतीही उणिव ठेवणार नाही असा मला विश्वास आहे. कठोर परिश्रम आणि निष्ठेने आसामचे भाग्य घडविण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतील. मंत्रिमंडळातले त्यांचे सहकारी, संपूर्ण मंत्रिमंडळही या संधीचा, आसामच्या कल्याणासाठी उपयोग करतील असा माझा विश्वास आहे.

मी आपणा सर्वांना विश्वास देऊ इच्छितो की दिल्लीतले केंद्र सरकार सहकार्य संघीय प्रणालीवर विश्वास ठेवते, स्पर्धात्मक सहकार्य संघीयतेवर विश्वास बाळगते, जे राज्य प्रगती करु इच्छिते त्याला जास्तीत जास्त ताकद देणे, प्रगती करतांना ज्या राज्याला अडचणी येत आहेत त्यांना मदत करत पुढे नेण्याचा प्रयत्न करणे, सर्व राज्ये आणि केंद्र सरकार खांद्याला खांदा भिडवून राज्यांना आणि हिंदुस्तानला नव्या उंचीवर घेऊन जाण्याचा आमचा अखंड प्रयत्न सुरु आहे. आसामला कोणतीही उणीव भासू दिली जाणार नाही. आसाम सरकार वेगवान वाटचालीसाठी धाव, दिल्ली सरकार त्यापेक्षा एक पाऊल पुढे राहून जास्त वेगवान प्रगतीसाठी सदैव प्रयत्न करेल.

आसामच्या जनतेलाही मी आवाहन करतो की आपण जे स्वप्न पाहिले आहे, ते पूर्ण करण्यासाठी केवळ निवडणूकीत आपले सहकार्य पुरेसे नाही. गरज आहे ती लोकशाही भागीदारीद्वारे चालेल, सरकार आणि जनता खांद्याला खांदा भिडवून चालली तर अद्‌भूत परिणाम दिसून येतो. आसामची जनताही खांद्याला खांदा भिडवून आसामचे भाग्य बदलण्याचा संपूर्ण प्रयत्न करेल.

लाल किल्ल्यावरचे माझे भाषण आपण ऐकले असेल, संसदेतले माझे भाषण ऐकले असेल, संसदेतले माझे भाषण ऐकले असेल. देश स्वतंत्र झाल्यानंतर केंद्रात, राज्यात जितके सरकारे आली प्रत्येक सरकारने आपापल्या पध्दतीने काही ना काही चांगले करण्याचा प्रयत्न केला आहे यावर माझा विश्वास आहे आणि म्हणूनच जे काही चांगले होत आहे ते अधिक चांगले करुन मार्गक्रमण करणे आणि ज्या त्रुटी राहिल्या आहेत त्या पूर्ण करुन वेगाने पुढे जाणे ही काळाची गरज आहे.

सर्वानंद यांच्या नेतृत्वाखाली आसामची एक महान परंपरा आहे. हे सांस्कृतिक प्रेरणेचे केंद्र आहे. भारताला अनेक विषयांबाबत प्रेरणा देण्याची ताकद या धरतीची आहे. आसामला नव्या शिखरावर आणि देशाला नवी ताकद देण्यासाठी या धरतीचा उपयोग होईल असा मला विश्वास आहे. भारताचा विकास सर्वसमावेशक असावा, भारताचा विकास संतुलित असावा, भारताचा विकास सर्वसमावेशक असावा यावर माझा सदैव विश्वास राहिला आहे. आणि म्हणूनच हिंदुस्तानचा पूर्वेकडचा भाग विकासापासून वंचित राहिला तर आपली भारत माता समृध्द होणार नाही. भारताचा पश्चिम भाग पुढे जात असेल तर भारताचा पूर्वेकडच्या भागाचाही त्याच गतीने विकास व्हायला पाहिजे. आसाम, बंगाल, बिहार, पूर्वी उत्तरप्रदेश, ओदिशा, ईशान्य ही सारी क्षेत्रे येत्या दशकात हिंदुस्तानाला नवी आर्थिक ताकद देऊ शकतात, अधिक गती देऊ शकतात.

आमची ॲक्ट ईस्ट पॉलिसी आहे, भारताचा प्रभाव ओळख निर्माण करण्यात भारताच्या या भूभागाचे मोठे महत्व आहे. हा आमचा अष्टलक्ष्मी प्रदेश सेव्हन सिस्टर्स म्हणून ओळखला जात असेल. हा संपूर्ण ईशान्य प्रदेशाचा विकास हिंदुस्तानच नव्हे तर पूर्वेकडच्या देशांमध्येही प्रभाव निर्माण करण्याची क्षमता बाळगुन आहे आणि म्हणुनच संपूर्ण ईशान्येच्या विकासासाठी आसाम एक मोठा केंद्र बिंदू आहे. गुवाहाटी एक मोठा केंद्रबिंदू आहे. त्याला पुढे नेण्याच्या दिशेने केंद्र आणि राज्य सरकार मिळून काम करतील असा विश्वास मी तुम्हाला देतो. सर्वानंद यांना, त्यांच्या सहकाऱ्यांना आसामच्या जनतेला मी हार्दिक अनेक अनेक शुभेच्छा देतो.

N.Chitale/B.Gokhale