Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आसाम मंत्रिमंडळाच्या शपथविधी समारंभातले पंतप्रधानांचे वक्तव्य

आसाम मंत्रिमंडळाच्या शपथविधी समारंभातले पंतप्रधानांचे वक्तव्य


आसाम मंत्रिमंडळाच्या शपथविधी समारंभासाठी जमलेल्या मोठया जनसमुदायाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संबोधित केले.

आसामच्या जनतेचे त्यांनी अभिनंदन केले. समाजाच्या सेवेला वाहून घेतलेले आदिवासी समाजाचे सर्बानंद सोनोवाल हे आसामी जनतेला मुख्यमंत्री म्हणून लाभले आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

आसाममधले नवे सरकार आसामच्या जनतेसाठी कार्यरत राहील आणि विकासाच्या माध्यमातून राज्याचा कायापालाट घडवेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

सहकार्यात्मक संघीयतेच्या तत्वावर केंद्र सरकार काम करत असून राज्यांनी प्रगती करावी यासाठी त्यांना जास्तीत जास्त बळ देऊ इच्छिते. लोकशाहीत भागीदारी अर्थात सहभाग अनस्यूत आहे असे सांगून काम करायला हवे असे पंतप्रधान म्हणाले. देशाच्या विशेषत: पूर्वेकडच्या भागाच्या सर्वांगिण विकासाच्या गरजेवर त्यांनी भर दिला.

N.Chitale/B.Gokhale