Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आसाम राज्य स्थापनादिनानिमित्त पंतप्रधानांनी आसामच्या जनतेला दिल्या शुभेच्छा


नवी दिल्ली, 2 डिसेंबर 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाम राज्य स्थापनादिनानिमित्त आसाममधील बंधु आणि भगिनींना शुभेच्छा दिल्या आहेत. स्वर्गदेव चाओलुंग सुकाफा यांचे स्वप्न पूर्ण करण्याप्रति आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्याचा आजचा दिवस आहे; असे मोदी म्हणाले. “गेल्या काही वर्षांत, केंद्र आणि आसाममधील रालोआ सरकार आसामच्या प्रगतीला चालना देण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत.”

“या प्रदेशातील भौतिक आणि सामाजिक पायाभूत सुविधा वाढवण्यात उल्लेखनीय प्रगती झाली आहे. ताई-अहोम संस्कृती आणि ताई भाषा लोकप्रिय करण्यासाठी अनेक पावले उचलली जात आहेत. याचा आसाममधील तरुणांना मोठा फायदा होईल”, असे मोदी म्हणाले.

आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे:

“आसाममधील माझ्या बंधु आणि भगिनींना आसाम राज्य स्थापनादिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”

“स्वर्गदेव चाओलुंग सुकाफा यांनी पाहिलेले  स्वप्न पूर्ण करण्याप्रति आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्याचा आजचा दिवस आहे. गेल्या काही वर्षांत, केंद्र आणि आसाममधील रालोआ सरकार आसामच्या प्रगतीला चालना देण्यासाठी अथक परीश्रम करत आहेत. या प्रदेशातील भौतिक आणि सामाजिक पायाभूत सुविधांचा विकास  करण्यात उल्लेखनीय प्रगती झाली आहे.”

“ताई-अहोम संस्कृती आणि ताई भाषा लोकप्रिय करण्यासाठी अनेक पावले उचलली जात आहेत. याचा आसाममधील तरुणांना मोठा फायदा होईल.”

सुषमा काणे/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com