Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आसाम रायफल्स आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयोमर्यादेत वाढ करण्याला मंत्रिमंडळाची मान्यता


आसाम रायफल्स आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयोमर्यादेत 60 वरून 65 पर्यंत वाढ करण्याला मंत्रिमंडळाने पूर्वलक्षी प्रभावाने मान्यता दिली आहे.

आसाम रायफल्स आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातल्या, गृहमंत्रालयाच्या विशेष वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयोमर्यादेत 60 वरून 65 पर्यंत वाढ करायलाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

यामुळे वैद्यकीय केडरचे हे अधिकारी सेवेत राहणार असून त्यामुळे रुग्णांची उत्तम काळजी, त्याचबरोबर वैद्यकीय महाविद्यालयाच्या योग्य शैक्षणिक कारभारासाठी मदत होणार आहे. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीही हा निर्णय उपयुक्त ठरणार आहे.

N. Sapre/N.Chitale/Darshana