पीएम्इंडिया
तान दातो डॉ. मुनीर अब्दुल मजिद, आसियान व्यापार सल्लागार परिषदेचे अध्यक्ष
दातो रमेश कोड्डामल, आसियान- भारत व्यापार परिषदेचे सह-अध्यक्ष,
आसियानमधील उद्योगपती,
आसियान उद्योग समूहातील सदस्य,
सन्माननीय अतिथी,
मान्यवरांनो,
येथे उपस्थित राहून मला खूप आनंदी वाटत आहे. या ठिकाणी दक्षिण पूर्व आशियाला जगातील वेगवान क्षेत्र बनविणा-या या सन्माननीय नेत्यांमध्ये राहण्याचा मला गर्व वाटतो. आपणा सर्वांचे आसियान समुदाय बनविण्यासाठी, मी आभार मानतो.
भारत आणि आसियान, नैसर्गिक सहयोगी असून प्राचीन काळापासून आपले सबंध आहेत. हे संबंध आजही दोन देशांना व क्षेत्रांना एकत्र आणतात.
मित्रहो, 21 वे शतक हे आशियाचे शतक आहे, हे मी सदैव सांगत असतो. मी हे आशियाई देशाच्या मागील प्रगतीवरून सांगत आहे. आसियानचे दहा सदस्य एकत्र येऊन एक आर्थिक शक्तीस्थळ बनवतात. आसियान जगातील सर्वात मोठ्या आर्थिक क्षेत्रामध्ये गणले जाते. तुमची मागील 15 वर्षे जलद व स्थिर विकासाची आहेत. तुमच्या अर्थव्यवस्थेची स्थिरता हे दक्षिण पूर्व आशियाच्या विकासाच्या स्थिरतेचे प्रमुख कारण आहे. चांगले शासन, भविष्योन्मुख पायाभूत सोयीसुविधा व नवे तंत्रज्ञान यावर आपले लक्ष्य केंद्रित करून आपण चांगले कार्य केले आहे.
पर्यटनासारख्या साध्या गोष्टींमध्येसुद्धा तुम्ही चमत्कार घडविले. मी पुन्हा एकदा या उपलब्धीसाठी आपले अभिनंदन करतो.
जेव्हा मी आसियानच्या या चमत्काराचे विश्लेषण करतो, तेव्हा माझ्या असे लक्षात येते की, आसियानमधील छोटे व चिनसारखे मोठे देश यांनी एकसारखे कार्य केले आहे. यावरुन हे स्पष्ट होते की, विकास केवळ लोकसंख्येवर अवलंबून नसून लोकांच्या भावनांवर अवलंबून आहे. मी जगभरात अनेक ठिकाणी गेलो असून पंतप्रधानपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतरही मी आसियानच्या नेत्यांसोबत नेहमी भेट घेत असे. मागच्या शिखर परिषदेमध्येसुद्धा मी पुष्कळ आसियान नेत्यांची भेट घेतली.
माझ्या सरकारने 18 महिन्यापुर्वी जेव्हा कार्यभार हाती घेतला, तेव्हा भारतीय अर्थव्यवस्था अनेक गंभीर आव्हानांचा सामना करत होती. मोठी राजकोषीय तूट, चालू खात्यामध्ये वाढणारी तुट व मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांच्या ठप्प पडलेल्या योजना.
देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणांची गरज आहे, हे यावरून स्पष्टच होते. आम्ही तेव्हा स्वत:लाच एक प्रश्न केला- ह्या सुधारणा कशासाठी?, सुधारणांचे लक्ष्य काय? हे केवळ स्थूल उत्पादनाच्या वाढीसाठी आहे की सामाजिक बदलासाठी? माझे उत्तर स्पष्ट आहे- आम्हांला परिवर्तनासाठी सुधारणा करायच्या आहेत.
थोडक्यात सांगायचे झाले तर सुधारणा हेच केवळ अंतिम ध्येय असू शकत नाही. माझ्यासाठी सुधारणा ध्येयाकडे उचलले एक पाऊल आहे. विकासाची फळे समाजातील वंचित व गरीबीमध्ये जीवन जगणाऱ्या लोकांपर्यंत पोहचवायची आहेत. आकाशाला गवसणी घालण्यासोबतच आम्हाला या लोकांच्या जीवनाला सुध्दा स्पर्श करायचा आहे.
आपण प्रमुख आर्थिक संकेतांकडे बघितल्यास मागच्या कालावधीपेक्षा आमच्या कार्यकाळापासून गेल्या 18 महिन्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचे चित्र खूप चांगले दिसत आहे.
— स्थुल उत्पादनात व़ध्दीचा दर वाढला व महागाई कमी झाली आहे.
— विदेशी गुंतवणूक वाढली व चालू खात्यामध्ये तूट कमी झाली आहे.
— कर महसूल वाढला असून, व्याज दर कमी झाला .
— वित्तीय तूट कमी झाली असून रूपयाची किंमत स्थिर झाली आहे.
निश्चितपणे, सर्व अचानक झाले नाही. वैश्विक अर्थव्यवस्थेचे प्रदर्शन चांगले नाही. भारताचे हे यश,सतत प्रयत्नांचा परिणाम आहे. आम्ही आता उत्कृष्ठ अशा वित्तीय व्यवस्थापनाकडे वाटचाल करत आहेत. प्रथमच आम्ही महागाई आटोक्यात आणण्यासाठी भारतीय रिजर्व बॅकेसोबत चलनी आराखड्याचा करार केला आहे.
आम्ही वित्तीय तूट कमी करण्यासोबतच उत्पादक गुंतवणूकसुध्दा वाढवली आहे. हे दोन प्रकारांनी शक्य झाले. प्रथमत: आम्ही जीवाश्म इंधनावर कार्बन कर लावला. डिझेलच्या किंमतीवरील नियंत्रण हटवून उर्जा अनुदान बंद करण्याचा धाडसी निर्णय घेतला.यासोबतच जीवाश्म इंधनावर कर लादला. आम्ही कोळशावर 300 टक्के पर्यंत उप-कर वाढविला आहे. जगभरात कार्बन कराची खूप चर्चा होते. आम्ही हे करून दाखविले आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करून, या अनुदानाला ख-या लाभार्थ्यापर्यंत पोहचविले आहे.
एकंदरीत देश व देशाबाहेर लोकांचा विश्वास वाढला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँक यांनी यावर्षी व पुढच्या वेळीसुध्दा आपल्या अर्थव्यवस्थेच्या चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली आहे. द इकोनॉमिस्ट पत्रिकेने भारताची स्थिती कुठल्याही उगवत्या अर्थव्यवस्थेपेक्षा चांगली असल्याचे, या आठवडयात सांगितले आहे.
तसे मी या आधी म्हटले, आम्हाला केवळ सुधारणा करणे हेच लक्ष्य नाही. आम्ही परिवर्तनासाठी सुधारणा करू इच्छितो. बृहत-अर्थव्यवस्थेची स्थिरता तर ठिक आहे पण भारतात या परिवर्तनासाठी अजून जास्त प्रयत्न करावे लागतील. यासाठी आम्ही पावले उचलली आहेत. यामध्ये पायाभूत परिवर्तनापासून संस्थात्मक सुधारणांचा समावेश आहे.
भारतामध्ये शेती/कृषी हे लोकांच्या उपजिवकेचे मुख्य साधन आहे.यामध्ये सुधारण्यासाठी आम्ही सोपी पण मजबूत पावले उचलली आहेत. अनुदानीत खतांचा वापर रसायनाच्या उत्पादनासाठी करण्याची वृत्ती राहिली आहे. यासाठी आम्ही सामान्य व प्रभावी उपाय शोधले. आम्ही खताचे नीम कोटींग केले व आता याचा वापर रसायन निर्मितीमध्ये घेत नाही. यामुळे कृषी क्षेत्रासाठी दिले जाणारे अब्जावधी रूपयाचे अनुदान वाचले.
आम्ही मृदा आरोग्य कार्डची सुरूवात केली. यामुळे शेतक-यांना मृदेच्या स्थितीची माहिती, पिक निवड करण्यात मदत मिळते.या कार्डमुळे त्याला जास्त उत्पादन मिळते व तो योग्य बियाणाचा वापर करू शकतो.
आम्ही ‘सर्वांसाठी घरे’ हा कार्यक्रम सुरू केला, हा जगातील महत्वाकांक्षी कार्यक्रमापैकी एक असून याच्या अंतर्गत 2 कोटी शहरी व 2.95 कोटी ग्रामीण घरांचे निर्माण, असे एकंदरीत पाच कोटी घरांचे निर्माण होणार आहे. या कार्यक्रमाअंतर्गत कोणताही भारतीय बेघर राहणार नाही व या माध्यमातून कुशल, अकुशल व अर्धकुशल कामगार व गरीबांसाठी मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती सुनिश्चित होणार आहे.
परिवहन क्षेत्रात आम्ही खूप सुधारणा केल्या आहेत. 2014-15 या वर्षात आमच्या प्रमुख बंदरामध्ये 4.65 टक्के एवढी सामान-वाहतूक वाढली आहे. व त्याच्या कार्यान्वित उत्पन्नात 11.2 टक्के एवढी वाढ झाली आहे. जगात व्यापाराच्या प्रमाणात घट झाल्यानंतरही ही वाढ झाली. नव्या महामार्गाच्या निर्मितीसाठीचे कंत्राट देण्याच्या प्रक्रियेस वेग मिळाला आहे. 2013-14 मध्ये प्रति दिवस 9 कि. मी. एवढे रस्ते बनत होते पण आता प्रत्येक दिवशी 23 कि.मी. एवढया रस्त्याचे निर्माण होत आहे. अर्थव्यवस्थेवर याचा फार मोठा परिणाम होणार आहे.
नैसर्गिक संसाधनाच्या विरतण प्रक्रियेमध्ये विश्वसनियता टिकवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कोळसा, खनिजे व स्पेक्ट्रम यासारख्या महत्वपूर्ण सामग्री व कच्चा मालाच्या वितरणव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आमच्या सरकारने यासाठी कायदेशीर व प्रशासकीय सुधारणा केल्या आहेत.
आम्ही जन-धन-योजना सुरू केली. एक वर्षाच्या आतच आम्ही 190 दशलक्ष नवी बँक खाती आम्ही उघडले. आम्ही विमा व सेवानिवृत्ती वेतन यासाठी आकर्षक योजना राबविल्या. आम्ही मुद्रा बँक उभारल्या ज्याअंतर्गत निधीची कमतरता असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना निधी देण्यात आला. या योजनेमुळे, 60 लाखापेक्षाजास्त व्यावसायिकांना कर्ज मिळाले आहे.
आम्ही बैंकींग सुविधांचा विस्तार करण्यासोबतच बैंकींग प्रणालीला मजबूत करण्यासाठी पाऊले उचलली आहेत. विश्वसनीय व सक्षम बँकेच्या अधिका-यांना बँकेचे प्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे.46 वर्षापूर्वी आमच्या येथे बँकेचे राष्ट्रीयीकरण झाले होते. तेव्हापासून पहिल्यांदाच राष्ट्रीयीकृत बँकामध्ये खाजगी क्षेत्रातील तज्ञांची नेमणूक महत्वाच्या पदांवर करण्यात आली. आम्ही पायाभूत सुविधा क्षेत्राला वेग देण्यासाठी व ऊर्जाक्षेत्रात व्यापक सुधारणा घडविण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. या सर्व निर्णयांचा आपल्या बँकांनासुद्धा लाभ मिळणार आहे.
आता आपण गुंतवणुकीविषयी चर्चा करू ती आपल्यासाठी प्रासंगिक आहे. आम्ही 65 वर्षापूर्वीच्या परंपरेला छेद देत देशाच्या परराष्ट्र धोरणामध्ये राज्यांना समाविष्ट करण्याची सुरूवात केली. जेव्हा मी चीनचा दौरा केला, तेव्हा राज्य ते राज्य संमेलनाची सुरूवात केली आणि सर्व राज्यांना निर्यात प्रोत्साहन परिषद स्थापन करण्याचे सांगितले होते. राज्यांना जागतिक पद्धतीने विचार करण्यासाठी प्रेरित करण्यात आले. यामुळे परिवर्तनाची भावना वाढते.
आमचे लक्ष्य अब्जावधी हातांना रोजगार देण्याचे आहे. यासाठी स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये निर्मितीक्षेत्राचे योगदान 25 टक्के असले पाहिजे. आम्ही मेक-इन इंडिया कार्यक्रम सुरू करून, व्यापार सुलभीकरणाच्या दिशेने कार्य सुरू केले आहे. आम्ही जाचक प्रकियांना हटवून, एकाच ठिकाणी ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. युध्दपातळीवर कार्य करून सर्व अर्ज व मसुदयांना, सोपे बनवले गेले. अशा प्रकारे, आम्ही सुगम व्यवसायासाठी, 2016 या वर्षी प्रकाशित होणा-या जागतिक बँक सुचकांकामध्ये भारत 12 स्थाने वर जाण्यात यशस्वी झाला आहे. उद्योगांना या परिवर्तनाचे फायदे मिळत आहेत.
जागतिक स्तरावरील पायाभूत सुविधा निर्माण करणे भारताचे स्वप्न आहे. त्यासाठी आमचे जास्त लक्ष भविष्यातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर आहे. या क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी आम्ही खाजगी-सार्वजनिक-भागीदारीच्या माध्यमातून आम्ही प्रोत्साहन देत आहोत. सार्वजनिक गुंतवणूक वाढवण्यासाठी आम्ही राष्ट्रीय गुंतवणूक व पायाभूत सुविधा निधीची स्थापना करत आहोत. यासोबतच आम्ही कार्पोरेट रोखे बाजाराच्या विस्तारासाठी तसेच सुविधा क्षेत्राला दीर्घकालीन वित्तपुरवठा करण्यासाठी करमुक्त पायाभूत सुविधा रोखे घेऊन येत आहोत. याच संदर्भात आम्ही मलेशिया, सिंगापूर, व दुस-या आसियान देशांसोबत मिळून काम करण्यासाठी इच्छुक आहोत.
आमच्या या प्रयत्नामुळे खालील परिणाम घडले आहेत
– खाजगी गुंतवणूकसाठी चांगले वातावरण निर्माण झाले असून विदेशी गुंतवणुक 40 टक्क्यांनी वाढली आहे.
– वैश्विक संस्थानी भारताला वारंवार गुंतवणूकीसाठी आकर्षक अर्थव्यवस्था म्हणून चिन्हांकित केले आहे.
– गुंतवणूकीसाठी आकर्षक अर्थव्यवस्था म्हणून यूएनसीटीएडीच्या मानांकनात भारताचा क्रमांक वाढला आहे.
– वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या वैश्विक प्रतिस्पर्धा सूचकांकामध्ये सतत पाच वर्षे खालच्या क्रमांकावर राहिल्यानंतर आता 16 व्या स्थानावर भारत पोहचला आहे.
– मूडीज या संस्थेने भारताच्या दृष्टिकोनाला बढती दिली आहे.
डिजीटल इंडिया व स्किल इंडिया हे उपक्रम लोकांना या प्रक्रियांमध्ये सहभागी करण्यासाठी सुरू करण्यात आले. या दिवसात आमच्याकडे स्टार्ट-अपमध्ये मोठी गती आली असून या उर्जेचा पुरेपूर उपयोग करण्यासाठी आम्ही स्टार्ट-अपचे अभियान सुरू केले आहे.
भारताच्या क्षमतेबद्दल जागतिक गुंतवणूकदारांना असलेली रुची आम्ही माहिती आहे. यासाठी, देशाकडे निधीचा प्रवाह वाढविण्यासाठी आम्ही दुस-या टप्प्यात संरचानात्मक व वित्तीय सुधारणा प्रारंभ केल्या आहेत. आम्ही अर्थव्यवस्थेला अधिक खुली करण्याचा व करप्रणालीमध्ये स्थिरता आणण्याचे प्रयत्न करत आहोत.
या संदर्भात काही उदाहरणे मी देतो.
– आम्ही विमा, संरक्षण व रेल्वे सारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये थेट विदेशी गुंतवणुकीची सीमा वाढवली आहे.
– आता यामधील बहुतांश थेट विदेशी गुंतवणूक क्षेत्रांना ऑटोमॅटिक अप्रुवल रूटच्या अंतर्गत आणले आहे.
– आम्ही बऱ्याच क्षेत्रांमध्ये थेट विदेशी गुंतवणुकीच्या धोरणाला सुसंगत केले आहे. यामध्ये बांधकाम,प्रकल्प व वैद्यकीय उपकरणांचे क्षेत्र समाविष्ट आहेत.
ज्या क्षेत्रांमध्ये परदेशी थेट गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली आहे, त्या सर्व क्षेत्रांमधील परदेशी गुंतवणूकदारांसाठी कंपोझिट कॅपला परवानगी देण्यात आली आहे.
-आम्ही परवाना पध्दती खूप प्रमाणात लवचिक केली आहे. उदाहरणार्थ संरक्षण क्षेत्राची 60 टक्के उपकरणे आम्ही प्रकियेच्या बाहेर ठेवले आहे.
– पूर्वलक्षी कर प्रणाली आम्ही बंद केली आहे.
– आम्ही वैकल्पिक गुंतवणुक निधीच्या नियमांना अधिसूचित केले आहे.
– आम्ही स्थावर मालमत्ता गुंतवणुक ट्रस्टसाठी लागणा-या भांडवली मिळकत कराला अधिक सुसंगत केले आहे.
– आम्ही जनरल अॅटि अवॉयडेंस रुलची अंमलबजावणी (गार) पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
– आम्ही संसदेमध्ये वस्तु व सेवा कर विधेयक मांडले असून आम्हाला 2016 मध्ये तो लागु होण्याची अपेक्षा आहे. यामुळे, संपुर्ण देशात करव्यवस्था एक होणार आहे.
– आम्ही दिवाळखोरीच्या कायद्यासाठी एक नवा मसुदा तयार केला आहे. कंपनी कायदा लवाद,स्थापन केला असून त्याच्या माध्यमातून संबधित प्रकरणे जलद गतीने निकाली काढण्यात येतील.
ही या सुधारणांची काही उदाहरणे आहेत. तसे आपण रोज विकासकार्यामध्ये अडथळा आणणा-या समस्यांना दूर करतो. पण, या महिन्याच्या प्रारंभी आम्ही अर्थव्यवस्थेला थेट विदेशी गुंतवणुकीसाठी खुले केले असून , सुधारणांच्या या युगामध्ये आम्ही जगातील सर्वात खुल्या अर्थव्यवस्थेपैकी एक अर्थव्यवस्था झालो आहोत.
यानंतरही मी असे सांगु इच्छितो की, भारत नवउन्मेषकांच्या बौद्धिक संपदा अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे. या दिशेने आम्ही पारदर्शकता ठेवून बौद्धिक संपदा व्यवस्थापनामध्ये ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली आहे. या वर्षाअखेर, एक नवे बौद्धिक संपदा अधिकार धोरण येणार आहे. कर प्रकरणांचा योग्य निकाल लावण्यासाठी आम्ही करव्यवस्थेला अधिक पारदर्शी व स्थिर बनवणार आहोत.
मित्रहो, भारत अपार संधीची भूमी आहे. काही उदाहरण देतो. पन्नास शहरे मेट्रो रेल्वे प्रणालीसाठी सज्ज आहेत. आम्हाला पाच कोटी लोकांसाठी स्वस्त घरे बनवायची आहेत. रस्ते, रेल्वे व जलमार्गाची मोठी गरज आहे. आम्ही मोठया प्रमाणात नवीकरणीय उर्जा स्वीकार करण्याचा निर्णय घेतला. या उर्जेची क्षमता 175 गिगावॅट एवढी असून आम्हाला हे सर्व कमी वेळात पूर्ण करायचे आहे. आमचे लोकतांत्रिक मूल्य व सजग न्याय-प्रणाली देशामध्ये गुंतवणुकीला सुरक्षित ठेवते. आम्ही दूरदृष्टि व खुल्या मनाच्या शासनाला वाव दिला असून भारताला व्यापारासाठी सर्वात सुगम स्थान बनविण्याचे आमचे प्रयत्न चालू आहेत.
मित्रहो, अधिकांश आसियान देश आशियाच्या पुर्नरचनेसाठी आपले योगदान देत आहेत. आता भारताची पाळी आहे. आम्हाला माहित आहे की, आमची वेळ आली आहे, आम्ही यासाठी तयार आहोत. भारतामधील या परिवर्तनाच्या वाऱ्याचा अनुभव घेण्यासाठी मी आपल्याला आमंत्रित करत आहे. परिवर्तनाच्या वाऱ्याला सीमा पार करण्यासाठी वेळ लागतो. यासाठी मी वैयक्तिक पातळीवर आपल्याला आमंत्रित करत आहे. जेव्हा आपण येथे याल, तेव्हा आपल्याला नव्या व्यापारी वातावरणाचे चित्र दिसेल. भारतात आल्यांनंतर मी आपणास संपुर्ण सहकार्य करेल.
धन्यवाद !
D. Wankhede/S.Tupe/N.Sapre
We asked ourselves the question – Reforms for what? What is the aim of reform? My answer is clear: we must Reform To Transform: PM Modi
— PMO India (@PMOIndia) November 21, 2015
Reform for me is just a way station on the long journey to the destination. The destination is the transformation of India: PM Modi
— PMO India (@PMOIndia) November 21, 2015
By almost every major economic indicator, India is doing better than when we took office: PM Modi. Watch Live: https://t.co/RlKSe1Guct
— PMO India (@PMOIndia) November 21, 2015
GDP growth is up and inflation is down. Foreign investment is up and the CAD is down. Tax revenues are up and interest rates are down: PM
— PMO India (@PMOIndia) November 21, 2015
Macro-economic stability is good. But to transform India, much more needs to be done. We have begun a series of concerted steps: PM Modi
— PMO India (@PMOIndia) November 21, 2015
We have launched a 'Housing for All' program. It involves building 20 million urban houses and 29.5 million rural houses: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 21, 2015
Our major ports witnessed 4.65% growth in traffic and 11.2% increase in operating income in 14-15 despite a global contraction in trade: PM
— PMO India (@PMOIndia) November 21, 2015
The pace of award of new highway works has increased from 9 km/day in 13-14 to 23 km/day currently: PM Modi. Watch: https://t.co/RlKSe1Guct
— PMO India (@PMOIndia) November 21, 2015
IIP in current year shows a distinct improvement over the last year. We are working in all ways to make India a global manufacturing hub: PM
— PMO India (@PMOIndia) November 21, 2015
To re-vitalize the flow of investments, we have launched 2nd wave of reforms. We are trying to further open up the economy: PM Modi
— PMO India (@PMOIndia) November 21, 2015
I want to assure you that India is committed to protect IP Rights of innovators. A National IPR policy is expected by end of the year: PM
— PMO India (@PMOIndia) November 21, 2015
Most ASEAN economies have done their bit for Asia’s resurgence. Now, it is India's turn. We know that our time has come: PM Modi
— PMO India (@PMOIndia) November 21, 2015
I invite you to come and see the winds of change in India. Winds do take time to cross the borders. That is why I am here to invite you: PM
— PMO India (@PMOIndia) November 21, 2015
At the ASEAN Business & Investment Summit, I emphasised on India & ASEAN being natural partners & why we must deepen our economic ties.
— Narendra Modi (@narendramodi) November 21, 2015
Talked about how our Govt. is overcoming economic challenges, initiating reforms & creating infrastructure to bring more investment to India
— NarendraModi(@narendramodi) November 21, 2015
Track record of ASEAN countries is strong. Together, we will ensure that this century belongs to Asia! https://t.co/jqoibObXwc
— NarendraModi(@narendramodi) November 21, 2015
Happy to meet my friend, Premier Li Keqiang. We had wide-ranging talks on India-China ties during our meeting. pic.twitter.com/pzlis4mq2k
— NarendraModi(@narendramodi) November 21, 2015
Watch Live: PM @narendramodi is speaking at the 13th ASEAN-India Summit https://t.co/V53GEKSp4T
— PMO India (@PMOIndia) November 21, 2015
My speech at ASEAN-India Summit. As the world faces economic challenges, India & ASEAN are bright spots of optimism. https://t.co/Jgg4x1heO6
— Narendra Modi (@narendramodi) November 21, 2015
Highlighted need to expand our trade & economic partnership & increase cooperation in development of Ocean Economy. pic.twitter.com/1CbIZh5Lo8
— NarendraModi(@narendramodi) November 21, 2015